प्लास्टिक : ‘शाप की वरदान’

प्लास्टिकमुक्त जनजागृतीसाठी संपूर्ण जुलै महिना राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर आचरणात बेळगाव : ‘प्लास्टिक : शाप की वरदान’ आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिक ही गरजेची तितकीच अपरिहार्य बाब होऊन बसली आहे. वजनाला हलके, वापरायला सोपे यामुळे प्लास्टिकच्या वस्तूंना अनन्यसाधारण महत्त्व आले. परंतु, हेच प्लास्टिक भविष्यात आपल्या जीवावरही बेतणार आहे. जर प्लास्टिक वापराच्या नियमांचे पालन न करता त्याचा वापर असाच सुरू राहिला तर पुढे त्याचे दुष्परिणाम […]

प्लास्टिक : ‘शाप की वरदान’

प्लास्टिकमुक्त जनजागृतीसाठी संपूर्ण जुलै महिना राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर आचरणात
बेळगाव : ‘प्लास्टिक : शाप की वरदान’ आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिक ही गरजेची तितकीच अपरिहार्य बाब होऊन बसली आहे. वजनाला हलके, वापरायला सोपे यामुळे प्लास्टिकच्या वस्तूंना अनन्यसाधारण महत्त्व आले. परंतु, हेच प्लास्टिक भविष्यात आपल्या जीवावरही बेतणार आहे. जर प्लास्टिक वापराच्या नियमांचे पालन न करता त्याचा वापर असाच सुरू राहिला तर पुढे त्याचे दुष्परिणाम दिसून येणार आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जुलै महिना हा प्लास्टिकमुक्त जुलै म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आचरणात आणला जातो. प्लास्टिकमुक्ती खरोखरच झाली तर आपल्याला स्वच्छ रस्ते, स्वच्छ नद्या, नाले आणि समुद्र यांचे दर्शन घडणार आहे. म्हणूनच प्लास्टिकचा वापर घरी, कार्यालयात, शाळांत, सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स येथे कोठेही होऊ नये यासाठी आपण आग्रही असायला हवे.
प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळा
प्लास्टिकमुक्त जुलै ही प्लास्टिक फ्री फाऊंडेशनची संकल्पना आहे. ज्याअंतर्गत प्लास्टिकचा वापर शक्यतो केला जाऊ नये, यावर भर देण्यात येतो. सदर मोहीम या फाऊंडेशनच्या संस्थापक रिबेका प्रिन्स-रुईझ यांनी सुरू केली. त्यांच्या या मोहिमेमध्ये आज संपूर्ण जगभरातून अब्जावधी लोक सहभागी होऊन प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत. पर्यावरणाचा विचार करून या महिन्यात काही ठराविक तारखांना विशेष महत्त्व दिले आहे.
3 जुलै प्लास्टिक बॅगमुक्त दिन
त्यानुसार दि. 3 जुलै हा प्लास्टिक बॅगमुक्त दिन म्हणून आचरणात आणला जातो. आजही बाजारात जायचे म्हटल्यास आपल्या हातात प्लास्टिकच्या पिशव्याच येतात. परंतु, प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून आपण सर्वांनी सुती किंवा कापडी पिशव्या घेऊन जाणे आवश्यक आहे. चर्चा करताना किंवा कोठेही गप्पा मारताना आपण आपल्या देशात किती अस्वच्छता आहे? याबद्दल बोलत राहतो. आज आपले रस्ते स्वच्छ नाहीत. आपल्या गायींच्या पोटामध्ये प्लास्टिक जात आहे. याबाबत महानगरपालिकेने मोहीम हाती घेण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्याने कापडी पिशवी वापरण्यास सुरुवात केली तर कर्मचारीसुद्धा त्याचे अनुकरण करू शकतात. कोठेही  हॉटेलमध्ये पार्सल आणावयास जाताना आपण स्टीलचा डबा घेऊन गेल्यास हॉटेलचालकांची सोय होईल आणि आपल्यालाही प्लास्टिकच्या संपर्कात न आलेले अन्न मिळू शकेल.
राष्ट्रीय बॅग डे
याच महिन्यात 12 जुलै रोजी पुनर्वापर करता येण्याजोग्या बॅग वापरण्याचा आग्रह केला जातो. आपले भाजीविक्रेते रस्तोरस्ती भाजी विकतात. एक दृश आपल्याला नेहमी दिसते. चारचाकी वाहनातून उतरणारी एखादी स्त्राr दहा रुपयाची कोथिंबीर किंवा भाजीची जुडी आठ रुपयाला मागते. भाजीविक्रेते त्या दरामध्ये देतात. पण तीच स्त्राr किंवा एखादी व्यक्ती  कॅरीबॅग मागते, तेव्हा विक्रेताच प्लास्टिकबॅग निर्बंध आहेत, असे सांगतो. कॅरीबॅग मागणाऱ्या अशा स्त्रिया किंवा व्यक्ती पर्यावरणादिवशी मोठमोठी भाषणे देतात तेव्हा खेद वाटतो.
प्लास्टिकमुक्त पर्यावरण राखण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो!

आपण कोठेही जाताना आपल्यासोबत कापडी पिशवी घेऊन जावी. त्याची गरज आपल्याला नेहमीच भासत राहते.
कोणत्याही प्लास्टिक बॅग तितक्याच घातक असतात.
कोणतेही पेय पिण्यासाठी ‘स्ट्रॉ’ चा वापर करू नका. कधी कधी त्यांचा पुनर्वापर होऊ शकतो.
कागदी ‘स्ट्रॉ’ सुद्धा योग्य नाहीत. कारण हे ‘स्ट्रॉ’ बनविण्याच्या पेपरवर वॅक्स लावलेले असते. त्यामुळे ‘स्ट्रॉ’ न वापरणे उत्तम.
स्टीलच्या डब्यामधूनच आपले भोजन न्यावे.
ऑनलाईन पद्धतीने जेवण मागवताना त्यांनी दिलेले डबे धुवून पुनर्वापरासाठी (रिसायकलिंग) पाठवावेत.
कोणत्याही गेट टू गेदरसाठी प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास वापरणे थांबवणे आपल्या हातात आहे. निसर्गाला अडचणीत आणून आपण आपला आनंद घेणे हा गुन्हा आहे.
सॅनिटरी पॅडला पर्याय शोधता येतो. आज लोकसंख्येच्या तुलनेत किती सॅनिटरी पॅड आपण फेकून देत आहोत आणि पुढे त्याचे काय होते? हा विचार सुन्न करणारा आहे. मुख्य म्हणजे कचरा वेचक किंवा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेचा तरी विचार आपण करायला हवा. आपण देव पाहिला नाही. परंतु, खरेतर हे कचरा वेचक आणि स्वच्छता कर्मचारीच देवाचे दूत आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

– आरती भंडारे (पर्यावरणप्रेमी)