मोदींच्या ध्यानधारणेविरोधात उच्च न्यायालयात याचिका
तामिळनाडू काँग्रेसकडून कृतीला आव्हान
वृत्तसंस्था/ कन्याकुमारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे सुरू केलेल्या ध्यानधारणेला विरोधक आचारसंहितेचा भंग असे संबोधत आहेत. पंतप्रधान आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप तामिळनाडू काँग्रेसने केला असून त्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे, मोदींच्या कन्याकुमारी दौऱ्याबाबत थंगताई पेरियार द्रविड कळघम या संघटनेने गुरुवारी मदुराईमध्ये पंतप्रधानांच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवले.
निवडणुकीदरम्यान पंतप्रधानांच्या ध्यानधारणेवर निवडणूक कायद्यानुसार कोणतेही बंधन नसल्याचा दावा केला जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही निवडणूक आयोगाने पंतप्रधानांना अशीच परवानगी दिली होती. याबाबत तज्ञ सूत्रांनी लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 126 चा हवाला दिला आहे. त्यात सार्वजनिक सभा किंवा निवडणूक प्रचार आणि निदर्शनांवर बंदी घालण्याचा उल्लेख आहे. तसेच या कायद्यात फक्त मतदान होणार असलेल्या क्षेत्राचा समावेश आहे.
ध्यानधारणेची छायाचित्रे जारी
कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणेचा शुक्रवारी दुसरा दिवस आहे. सकाळी ध्यान करतानाची छायाचित्रे समोर आल्यानंतर ते भगवे वस्त्र परिधान केलेल्या स्थितीत निदर्शनास आले. तसेच हातात रुद्राक्ष जपमाळ आणि कपाळावर टिळा दिसून आला. आता 1 जून रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पंतप्रधान विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यानधारणा करणार आहेत. पंतप्रधान गुरुवारी संध्याकाळी कन्याकुमारीला पोहोचले होते. सर्वप्रथम भगवती देवी अम्मान मंदिरात दर्शन व पूजा करण्यात आली. मोदींनी पूजेदरम्यान पांढरा मुंडू (दक्षिण भारतातील वस्त्र) आणि शाल परिधान केली होती. पुजाऱ्यांनी खास आरती करत प्रसाद, शाल व देवीचे चित्र प्रदान करत त्यांचे स्वागत केले.
Home महत्वाची बातमी मोदींच्या ध्यानधारणेविरोधात उच्च न्यायालयात याचिका
मोदींच्या ध्यानधारणेविरोधात उच्च न्यायालयात याचिका
तामिळनाडू काँग्रेसकडून कृतीला आव्हान वृत्तसंस्था/ कन्याकुमारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे सुरू केलेल्या ध्यानधारणेला विरोधक आचारसंहितेचा भंग असे संबोधत आहेत. पंतप्रधान आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप तामिळनाडू काँग्रेसने केला असून त्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे, मोदींच्या कन्याकुमारी दौऱ्याबाबत थंगताई पेरियार द्रविड कळघम या संघटनेने […]