ओडिशात पटनायक राजवट संपुष्टात
विधानसभा निवडणुकीत 78 जागा जिंकणाऱ्या भाजपकडे सत्ता
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर/अमरावती
ओडिशात 24 वर्षांपासून सत्तेत असलेल्या नवीन पटनायक यांची सत्ता गेली आहे. 147 पैकी भाजपला 78 तर बीजेडीला 51 जागा मिळाल्या आहेत. तसेच काँग्रेसला 14 तर माकपला एका जागेवर समाधान मानावे लागले. ओडिशात नवीन पटनायक 24 वर्षे (मार्च 2000 पासून) मुख्यमंत्री आहेत.
ओडिशात भाजपने कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा न बनवता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली. ओडिशात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी निर्णायक आघाडी मिळवली आहे. राज्यात प्रथमच भाजपचे सरकार स्थापन होणार असून, अडीच दशके जुने बीजेडी सरकारचा हिरमोड झाला आहे. भाजपच्या या मोठ्या विजयानंतर भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते सज्जन शर्मा म्हणाले की, राज्यातील जनतेला तामिळ राजवट, कुशासन आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी आहे. आमच्याकडे असे सरकार असेल जे ओडिशातील लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करेल. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी भाजप महिला मोर्चाच्या टीमने श्रीराम मंदिरात जाऊन दीपदान केले आणि विजयासाठी भगवान श्रीरामाची प्रार्थना केली. यानंतर मतमोजणी सुरू होताच कार्यकर्ते टीव्हीसमोर डोळे लावून बसले होते. जनतेने बीजेडीचा चुकीचा कारभार नाकारत मोदीजींच्या विकासाला मान्यता दिली आहे.
ओडिशा : 147 जागा, बहुमत: 74
पक्ष जागा
भाजप 78
बीजेडी 51
काँग्रेस 14
इतर 4
Home महत्वाची बातमी ओडिशात पटनायक राजवट संपुष्टात
ओडिशात पटनायक राजवट संपुष्टात
विधानसभा निवडणुकीत 78 जागा जिंकणाऱ्या भाजपकडे सत्ता वृत्तसंस्था/ भुवनेश्वर/अमरावती ओडिशात 24 वर्षांपासून सत्तेत असलेल्या नवीन पटनायक यांची सत्ता गेली आहे. 147 पैकी भाजपला 78 तर बीजेडीला 51 जागा मिळाल्या आहेत. तसेच काँग्रेसला 14 तर माकपला एका जागेवर समाधान मानावे लागले. ओडिशात नवीन पटनायक 24 वर्षे (मार्च 2000 पासून) मुख्यमंत्री आहेत. ओडिशात भाजपने कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा […]