चर्चिल भाजपात आल्यास पक्षाचे बळ वाढेल : सिक्वेरा
पणजी : चर्चिल आलेमाव यांनी भाजपात प्रवेश केल्यास पक्षाचे बळ निश्चितच वाढेल, असा ठाम विश्वास पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी व्यक्त केला आहे. खास करून येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चिल यांनी प्रवेश केल्यास पक्षासाठी ते फायद्याचेच ठरणार आहे, असे ते म्हणाले. मंगळवारी पर्वरीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान सिक्वेरा पत्रकारांशी बोलत होते. तसेही चर्चिल नाही आले तरीही दक्षिण गोव्यात भाजपचाच उमेदवार विजयी होईल, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. चर्चिल आलेमाव यांनी नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले होते. तोच धागा पकडून पत्रकारांनी सिक्वेरा यांना छेडले असता त्यांनी वरीलप्रमाणे वक्तव्य केले. त्यांनी भाजपात प्रवेश केल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू, असेही सिक्वेरा म्हणाले.
Home महत्वाची बातमी चर्चिल भाजपात आल्यास पक्षाचे बळ वाढेल : सिक्वेरा
चर्चिल भाजपात आल्यास पक्षाचे बळ वाढेल : सिक्वेरा
पणजी : चर्चिल आलेमाव यांनी भाजपात प्रवेश केल्यास पक्षाचे बळ निश्चितच वाढेल, असा ठाम विश्वास पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी व्यक्त केला आहे. खास करून येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चिल यांनी प्रवेश केल्यास पक्षासाठी ते फायद्याचेच ठरणार आहे, असे ते म्हणाले. मंगळवारी पर्वरीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान सिक्वेरा पत्रकारांशी बोलत होते. तसेही चर्चिल नाही आले तरीही दक्षिण […]