उत्तराखंडमध्ये दिवाळीच्या दिवशी बोगद्याचा भाग कोसळला, 36 मजुरांना वाचवण्यासाठी काय केलं जातंय? वाचा

उत्तराखंडमधील ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या बोगद्याचा भाग कोसळला असून बोगद्यात काम करणारे 36 मजूर अडकले आहेत. कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

उत्तराखंडमध्ये दिवाळीच्या दिवशी बोगद्याचा भाग कोसळला, 36 मजुरांना वाचवण्यासाठी काय केलं जातंय? वाचा

– आसिफ अली

उत्तराखंडमधील ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या बोगद्याचा भाग कोसळला असून बोगद्यात काम करणारे 36 मजूर अडकले आहेत. कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

 

हा बोगदा उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा ते डंडालगाव यांना जोडण्यासाठी बांधला जात आहे.

 

ताजी माहिती

याबाबत बोलताना उत्तरकाशीचे सीओ प्रशांत कुमार म्हणाले, “आम्ही आताच बोगद्यातून बाहेर आलो आहोत. काल रात्री मजुरांशी आमचा संपर्क झाला होता. एनएचआयडीसीएलच्या ज्या पाईपलाईनमधून पाणी आणि ऑक्सिजन पुरवला जातो त्याच्याद्वारे आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आतल्या लोकांनी ते ठीक असल्याचं सांगितलं. हे बोलणं वायरलेसद्वारे होत आहे. आतल्या लोकांची स्थिती कशी आहे आणि त्यांना कशाची गरज आहे हे यामाध्यमातूनच समजत आहे.”

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना फोन करून मदतकार्याची माहिती घेतली.

 

बोगद्यात अडकलेले कामगार सुखरूप असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांना बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मात्र, बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी कोणताही संवाद झालेला नाही.

 

अडकलेल्या कामगारांपैकी फक्त एकच उत्तराखंडचा आहे. उर्वरित कामगार बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.

 

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील मदत कर्मचारी स्थानिक पोलिस आणि प्रशासनासोबत एकत्र काम करत आहेत.

 

उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं की, बोगद्याच्या वरच्या बाजूचा अंदाजे 50 मीटर भाग कोसळला असून तो बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सुमारे 200 मीटर अंतरावर आहे.

 

तो भाग बनवण्याचं काम चालू असताना तो कोसळला. ते म्हणाले की, बोगद्यात अडकलेले सर्व लोक आतापर्यंत सुरक्षित आहेत.

 

“रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास महामार्गावर बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याच्या सिलक्यारा बाजूकडील प्रवेशद्वाराच्या 230 मीटर आत दगड-माती कोसळली.”

 

काही वेळातच 30 ते 35 मीटर अंतरावरून दगड-माती कोसळायला लागली आणि त्यानंतर अचानक मोठा ढिगारा आणि दगड पडू लागले. त्यामुळे बोगद्यात काम करणारे कामगार आत अडकले. दगड-मातीचा ढीग साचल्याने बोगद्याचा ऑक्सिजन पुरवठा बंद झाला.

 

पोलीस अधीक्षक म्हणाले की, ठबोगद्यात अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर सुखरूप बाहेर काढणं याला आमचं प्राधान्य आहे.”

 

यासाठी पोलीस दलाची तुकडी आणि मदत व बचाव पथक 24 तास घटनास्थळी मदतकार्यात व्यस्त राहणार आहेत. उत्तरकाशी पोलिसांनी बचाव मोहीम अपडेट आणि मदत क्रमांक +917455991223 सुद्धा सुरू केलाय.

 

कसा झाला अपघात?

एडीजी कायदा आणि सुव्यवस्था एपी अंशुमन यांनी सांगितलं की, रविवारी पहाटे 5 वाजता हा अपघात झाला, बोगद्यापासून सिलक्याराकडील प्रवेशद्वारापासून आत 200 मीटर अंतरावर भूस्खलन झालं. काम करणारे कामगार प्रवेशद्वाराच्या 2800 मीटर आत होते.

 

काही मीडियाच्या वृत्तानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल म्हणाले की, अडकलेल्या लोकांसमोर 400 मीटर रिकामी जागा आहे. त्यामुळे ते त्यात फिरू शकतात. दहा तास पुरेसा इतका ऑक्सिजन त्यांच्याकडे आहे.

 

बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी 13 मीटर रुंद मार्गावर जेसीबी आणि पोकलेन मशिन वापरण्यात येतंय.

 

अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून उत्तरकाशीतील घटनेची माहिती घेतली.

 

पंतप्रधानांनी मुख्यमंत्री धामी यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय.

 

या घटनेनंतर आपण सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं धामी यांनी सांगितलं.

 

“मी सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. अपघाताची संपूर्ण माहिती आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ घटनास्थळी हजर आहेत. सर्वजण सुखरूप बाहेर यावेत, अशी प्रार्थना आम्ही करतोय.

 

नवयुग कन्स्ट्रक्शन कंपनी उत्तराखंडमधील ‘ऑल वेदर रोड प्रोजेक्ट’ अंतर्गत उत्तरकाशीमध्ये एक बोगदा बांधतेय.

 

हा बोगदा ‘नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या देखरेखीखाली बांधला जातोय. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत या बोगद्याचं बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडमधील ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या बोगद्याचा भाग कोसळला असून बोगद्यात काम करणारे 36 मजूर अडकले आहेत. कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

Go to Source