पॅरिस ॲालिंपिक : मनू भाकर फायनलमध्ये, आज सामन्याची वेळ काय आहे?

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिंपिकचं रोज काय घडतंय, त्याचे अपडेट्स इथे वाचा. भारताच्या मनू भाकरनं 10 मीटर एयर पिस्टल नेमबाजीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आज भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता मनू फायनलमध्ये खेळेल.

पॅरिस ॲालिंपिक : मनू भाकर फायनलमध्ये, आज सामन्याची वेळ काय आहे?

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिंपिकचं रोज काय घडतंय, त्याचे अपडेट्स इथे वाचा.

भारताच्या मनू भाकरनं 10 मीटर एयर पिस्टल नेमबाजीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आज भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता मनू फायनलमध्ये खेळेल.

 

तसंच आज संध्याकाळी तिरंदाचीची उपांत्यपूर्व फेरी होणार आहे, त्यात भारताची महिला टीम सहभागी होईल. त्याशिवाय 10 मीटर एयर रायफल नेमबाजीची पात्रता फेरीही आज होणार आहे. तर रोईंग, बॅडमिंटन, बॉक्सिंग, स्विमिंग, टेनिस आणि टेबल टेनिस या क्रीडाप्रकारांत भारतीय खेळाडू सहभागी होतील

ऑलिंपिकमध्ये यंदा 32 क्रीडाप्रकारांत 329 सुवर्णपदकांसाठी हजारो अ‍ॅथलीट्स शर्यतीत आहेत. भारतानं या क्रीडा स्पर्धेसाठी 110 जणांचं पथक पाठवलं असून 16 क्रीडाप्रकारांत भारतीय खेळाडू सहभागी होतील.

मनू भाकरनं अशी गाठली फायनल (27 जुलै)

22 वर्षीय मनूनं 27 जुलैला झालेल्या पात्रता फेरीत 580 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवलं.

 

मनूनं पात्रता फेरीच्या पहिल्या दोन सीरीजमध्ये प्रत्येकी 97 गुणांची कमाई केली. तिसऱ्या सीरीजमध्ये 98 गुण मिळवत मनूनं तिसरं स्थान गाठलं. पाचव्या सीरीजमध्ये तिनं एका खराब शॉटवर फक्त 8 गुण मिळवले, पण तेवढा एक शॉट वगळता मनूनं उत्तम कामगिरी करत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.

 

भारताची आणखी एक पिस्टल नेमबाज ऱ्हिदम सांगवान पात्रता फेरीत पंधरावी आली. तिनं 573 गुणांची कमाई केली.

नेमबाजीच्या 10 मीटर एयर रायफल मिश्र प्रकारात भारताचं आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. अर्जुन बबुटा आणि रमिता जिंदाल यांनी 628.7 गुणांसह सहावं स्थान मिळवलं. संदीप सिंग आणि एलावेनील वेलारिवान यांनी बारावं स्थान मिळवलं.

 

भारताच्या पुरुष हॉकी टीमनं मात्र विजयी सलामी दिली आणि पहिल्या लढतीत न्यूझीलंडला 3-2 असं हरवलं.

 

शानदार उद्घाटन सोहळा

तब्बल 100 वर्षांनी पॅरिसमध्ये पुन्हा एकदा ऑलिंपिकचं आयोजन केलं जातंय. तसंच तिसऱ्यांदा पॅरिसनं ऑलिंपिकचं आयोजन केलं आहे.

 

ऑलिंपिकची सुरुवात जरी ग्रीसमध्ये झाली असली, तरी आधुनिक ऑलिंपिक पॅरिसमध्येच आकाराला आलं. साहजिकच या पॅरिसचं ऑलिंपिकशी खास नातं आहे. उदघाटन सोहळ्यातही त्याची झलक पाहायला मिळाली.

2024 चा उद्घाटन सोहळा न भूतो न भविष्यती असाच होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 205 देशांच्या संघांची परेड यावेळी स्टेडियममध्ये नाही, तर सीन नदीत बोटींवरून निघाली. परेडच्या पूर्ण मार्गावर ठीकठीकाणी कलाविष्कार पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या अखेरीस टॉर्च रिलेमध्ये फ्रान्सचा सुपरस्टार फुटबॉलर झिनेदिन झिदान सहभागी झाला. तर टेनिसस्टार राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, अमेली मोरेस्मो तसंच अ‍ॅथलीट कार्ल लुईस आणि जिम्नॅस्ट नादिया कोमानेची यांच्यासह फ्रान्सचे अनेक दिग्गज खेळाडू रिलेच्या अखेरच्या टप्प्यात सहभागी झाले होते.

 

एका महिला आणि पुरुष अ‍ॅथलीटनं एकत्रितपणे ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली आणि विविधतेत एकता आणि समानतेचा संदेश दिला. यंदा पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंचं प्रमाण 50-50% एवढं समान आहे.

लेडी गागा आणि सेलिन डियॉन सारख्या दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणानं उद्घाटन सोहळ्यात रंगत आणली.

लेडी गागानं सुरुवातीला गाणं सादर केलं तर सेलिन डियॉननं आयफेल टॉवरच्या अर्ध्यावरील टेरेसावरून गात कार्यक्रमाची सांगता केली. दोन वर्षांपूर्वी एका दुर्धर आजारामुळे गाण्याचे कार्यक्रम सेलिन डियॉननं बंद केले होते. एक प्रकारे तिचं हे कमबॅक ठरलं.

 

फ्रान्समधल्या कला, संगीत, इतिहास आणि ऑलिंपिक चळवळीची वाटचाल अशा गोष्टींचं प्रतीक त्यात पाहायला मिळालं.

Published By- Priya Dixit

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Go to Source