ठाकरे सेना कुडाळ वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढणार
सोमवारी मोर्चा, कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये यांची माहिती
दोडामार्ग – प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यात सातत्याने बत्ती गुल होत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सोमवारी कुडाळ येथील मुख्य कार्यालयावर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार असून कोनाळ विभागातील शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी केले आहे.याबाबत माहिती देताना श्री. मोर्ये पुढे म्हणाले, दोडामार्गच्या इतर भागाप्रमाणे कोनाळ विभागातील विविध गावात वीजेचा प्रश्न गंभीर आहे. अनेक गावे काळोखात असतात शिवाय कमी जास्त दाबाने वीज पुरवठा होत असल्याने उपकरणे जळतात अशा अनेक समस्या असून शिवसेना याबाबत आवाज उठवणार आहे तरी यामध्ये वीज ग्राहकानी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे .
Home महत्वाची बातमी ठाकरे सेना कुडाळ वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढणार
ठाकरे सेना कुडाळ वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढणार
सोमवारी मोर्चा, कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये यांची माहिती दोडामार्ग – प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यात सातत्याने बत्ती गुल होत असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सोमवारी कुडाळ येथील मुख्य कार्यालयावर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार असून कोनाळ विभागातील शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी केले आहे.याबाबत माहिती देताना श्री. मोर्ये पुढे […]