पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर छमछम! 10 ते 12 बालांसह 48 जणांवर सातारा पोलिसांची धडक कारवाई

कुडाळ प्रतिनिधी : पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेन्ट हाऊस वर बारबाला नाचवल्या याप्रकरणी दहा ते बारा बालांसह सोलापूर जिल्ह्यातील 24 खते औषधे बी बियाणे विक्रेत्या डीलर असे एकूण 35 ते ते 36 जणांवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व ॲडिशनल एसपी आचल दलाल यांनी या पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून कारवाई केली असल्याने सातारा […]

पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर छमछम! 10 ते 12 बालांसह 48 जणांवर सातारा पोलिसांची धडक कारवाई

कुडाळ प्रतिनिधी :

पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेन्ट हाऊस वर बारबाला नाचवल्या याप्रकरणी दहा ते बारा बालांसह सोलापूर जिल्ह्यातील 24 खते औषधे बी बियाणे विक्रेत्या डीलर असे एकूण 35 ते ते 36 जणांवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व ॲडिशनल एसपी आचल दलाल यांनी या पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून कारवाई केली असल्याने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे यामध्ये पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्ट चा मालक डॉक्टर विजय दिघे आंबेघर तालुका जावळी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
काल रात्री साडेदहा ते अकरा च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे याप्रकरणी पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्ट चे मालक डॉक्टर विजय दिघे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे रात्री उशिरापर्यंत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दोन महिन्यापूर्वी देखील पाचगणी येथीलच कासवंड येथे स्प्रिंग व्हॅली या रिसॉर्टवर देखील अशाच पद्धतीच्या बारबाला नाचवल्या गेल्या होत्या यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पाच डॉक्टरांवर कारवाई करण्यात आले होते त्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पाचगणी येथील पाचगणी टेन्ट हाऊस या रिसॉर्टवर मोठे कारवाई मानली जात आहे.
काल रात्री साडेदहाच्या सुमारास ॲडिशनल एस पी आचल दलाल यांना आपल्या खास खबऱ्यामार्फत माहिती मिळताच त्यांनी टीम पाचगणीच्या दिशेने रवाना केली पाचगणी रिसॉर्टवर सुरू असणाऱ्या छम छम वर सातारा पोलिसांनी छापा टाकला व यामध्ये रिसॉर्टच्या आत असणाऱ्या बारा बारबाला व सोलापूर जिल्ह्यातील कृषी खत विक्री व्यवसायिक असे एकूण 36 जणांना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतले आहे बाकी काही खत विक्री व्यवसायिक व बारबालांसह डान्स करणारे पाच ते सहा जण घटनास्थळावर आलिशान गाड्या सोडून पळून गेले असल्याची माहिती मिळाली आहे त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत सकाळी दहा वाजेपर्यंत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू होती.