काश्मीर-बांदीपोरामध्ये एक दहशतवादी ठार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथील अरागम भागातील गुरीहजनमध्ये रविवारी रात्री उशिरा चकमक झाली. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार गोळीबार झाल्यानंतर एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने संशयितांनी आश्रय घेतलेल्या भागात शोधमोहीम तीव्र केल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली. या भागात सोमवारीही शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या चार दहशतवादी हल्ल्यांनंतर वेगवेगळ्या ठिकाणी संशयितांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. याचदरम्यान बांदीपोरा जिह्यातील अरागम भागात सुरक्षा दलांना संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या. यानंतर त्यांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. 13 आरआरच्या गस्ती पथकाने अरागममध्ये संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर जवानांनी गोळीबार केला. परिसराची नाकेबंदी करून कारवाई केल्याची माहिती काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक व्ही. के. बिर्डी यांनी दिली. हे वनक्षेत्र असल्याने संशयित पळून जाऊ नयेत यासाठी संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी काश्मीर-बांदीपोरामध्ये एक दहशतवादी ठार
काश्मीर-बांदीपोरामध्ये एक दहशतवादी ठार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथील अरागम भागातील गुरीहजनमध्ये रविवारी रात्री उशिरा चकमक झाली. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार गोळीबार झाल्यानंतर एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने संशयितांनी आश्रय घेतलेल्या भागात शोधमोहीम तीव्र केल्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू […]