लोकमान्य सोसायटीच्यावतीने कारगिल विजय दिन उत्साहात

सैनिक सन्मान ठेव योजनेचा शुभारंभ वार्ताहर/ हिंडलगा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला कारगिल विजयोत्सव आपल्या देशातील भाग्याचा दिन असून आपल्या भारतीय जवानांनी प्राणार्पण करून भारत देशाला विजय  मिळवून दिला आहे. प्राणार्पण केलेल्या शहीद जवानांचे कायमस्वरूपी स्मरण करण्यासाठी या दिनाला अत्यंत महत्त्व आहे ,म्हणून हा दिन सर्वत्र  साजरा केला पाहिजे अशा प्रकारचे प्रतिपादन सैनिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट […]

लोकमान्य सोसायटीच्यावतीने कारगिल विजय दिन उत्साहात

सैनिक सन्मान ठेव योजनेचा शुभारंभ
वार्ताहर/ हिंडलगा
भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला कारगिल विजयोत्सव आपल्या देशातील भाग्याचा दिन असून आपल्या भारतीय जवानांनी प्राणार्पण करून भारत देशाला विजय  मिळवून दिला आहे. प्राणार्पण केलेल्या शहीद जवानांचे कायमस्वरूपी स्मरण करण्यासाठी या दिनाला अत्यंत महत्त्व आहे ,म्हणून हा दिन सर्वत्र  साजरा केला पाहिजे अशा प्रकारचे प्रतिपादन सैनिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे चेअरमन निवृत्त सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन राजाराम कोले यांनी गणेशपुर येथील लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या कारगिल विजयोत्सव कार्यक्रम प्रसंगी सभागृहात केले. व कारगिल युद्धाची सविस्तर दैनंदिन माहिती देऊन सर्वांच्यात राष्ट्राभिमान निर्माण केला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त कर्नल संजय पाटील उपस्थित होते.
प्रथम गणेशपूर येथील लोकमान्य सोसायटी शाखेच्या व्यवस्थापिका सुनीता सातेरी यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन अनिल शहापूरकर, श्रीकांत सुणगार यांच्या हस्ते स्वागत केले.
या कार्यक्रमाचा शुभारंभ निवृत्त सैन्याधिकारी राजाराम कोले, संजय पाटील ,अशोक जाधव ,प्रभाकर मुरगोड, सुबराव भोगण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. याप्रसंगी शहीद जवानांना एक मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहिली .यावेळी उपस्थित सर्व जवानांनी अमर रहे अमर रहे, वीर जवान अमर रहे अशा घोषणा दिल्या.
26 जुलै या कारगिल दिनाची आठवण म्हणून लोकमान्य सोसायटीच्या वतीने सैनिक सन्मान ठेव योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.