जुने गोवेत जमिनीच्या रुपांतरणाचा सपाटा
तृणमुलचे समिल वळवईकर यांचा आरोप : कुंभारजुवे आमदाराचा हात असल्याचा दावा
पणजी : सर्वसामान्य नागरिकांना जेथे केवळ 100 चौ. मी. जमिनीचे ऊपांतर करण्यासाठी वर्षांनुवर्षे लागतात तेथे राजकीय पाठबळातून तब्बल 50 हजार चौ. मी. जमीन एका रात्रीत ऊपांतरीत झाली आहे. राज्य व राष्ट्रीय स्मारकांसह जागतिक मान्यताप्राप्त वारसास्थळ म्हणून संरक्षित असलेल्या जुने गोवे परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्या निकटवर्तीयांचा यात हात आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे सहसंयोजक समिल वळवईकर यांनी केला आहे. पणजीतील पक्ष कार्यालयात काल मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत वळवईकर बोलत होते. भाजपवर जोरदार टीका करताना त्यांनी, हे सरकार गोव्याचा विनाश करण्यास पुढे सरसावले असून नगरनियोजन कायद्याला खुंटीला टांगून हवे त्या पद्धतीने आणि मनमानीपणे हव्या तेवढ्या जमिनींचे रात्रीत ऊपांतरण करण्यात येत असल्याचा आरोप केला. सध्या उत्तर गोव्यातील बहुतांश जमिनी एकतर राजकारण्यांनी बळकावल्या, खरेदी केल्या आहेत किंवा दिल्लीवाल्यांच्या घशात तरी घालण्यात आल्या आहेत. आता त्यांची दृष्टी जुने गोवे परिसरावर गेली आहे. हल्लीच या भागात वेगवेगळ्या झोनिंगमधून तब्बल 91,842 चौरस मीटरचे सेटलमेंट झोनमध्ये ऊपांतरण करण्यात आले असल्याचे कागदोपत्री पुरावे हाती लागले आहेत. यापैकी 57,253 चौरस मीटर जमीन वारसास्थळ असलेल्या जुने गोवे गावातील आहे, असे वळवईकर यांनी सांगितले.
खरा सूत्रधार आमदारच?
आश्चर्यकारक प्रकार म्हणजे केवळ 11 महिन्यांपूर्वीच स्थापन करण्यात आलेल्या ‘सीएमआर डेव्हलपर’ या कंपनीच्या नावे 1-14 च्या उताऱ्यात जमीन दाखविण्यात आली आहे. या कंपनीच्या तीनपैकी एक संचालक कुंभारजुवे मतदारसंघाच्या आमदारचा निकटवर्तीय असल्याचा दावा वळवईकर यांनी केला आहे. मात्र तो केवळ नामधारी असेल आणि खरा सूत्रधार हा आमदारच असला पाहिजे, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
हे कसे शक्य आहे?
केवळ 11 महिन्यांपूर्वी स्थापन झालेली कंपनी एवढी मोठी बागायती जमीन खरेदी करते. त्यानंतर ती ऊपांतरणासाठी घालते आणि ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन 1-14 च्या उताऱ्यावर सुद्धा नोंद करून सदर जमिनीची ती कंपनी मालक बनते. हे कसे शक्य आहे? असा सवाल वळवईकर यांनी उपस्थित केला. जुने गोवे परिसरात हल्लीच्या काही वर्षांत बेकायदेशीर बंगले उभारणे, अस्तित्वातच नसलेल्या वास्तूंना घरक्रमांक देऊन अस्तित्वात असल्याचे दाखविणे, इको-रिसॉर्टच्या नावाखाली मोठ्या जमिनी घशात घालण्याचे प्रयत्न करणे, असे अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. त्यात आता वरील प्रकाराची भर पडली आहे. यावरून सरकार जुने गोवेला उद्ध्वस्त करण्यास टपलेले आहे असेच दिसते, असे वळवईकर म्हणाले. याप्रश्नी आता राज्यातील सर्व विरोधी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन जमीन ऊपांतरणाविरोधात उघडपणे आवाज उठवावा, असे आवाहन वळवईकर यांनी केले आहे.
Home महत्वाची बातमी जुने गोवेत जमिनीच्या रुपांतरणाचा सपाटा
जुने गोवेत जमिनीच्या रुपांतरणाचा सपाटा
तृणमुलचे समिल वळवईकर यांचा आरोप : कुंभारजुवे आमदाराचा हात असल्याचा दावा पणजी : सर्वसामान्य नागरिकांना जेथे केवळ 100 चौ. मी. जमिनीचे ऊपांतर करण्यासाठी वर्षांनुवर्षे लागतात तेथे राजकीय पाठबळातून तब्बल 50 हजार चौ. मी. जमीन एका रात्रीत ऊपांतरीत झाली आहे. राज्य व राष्ट्रीय स्मारकांसह जागतिक मान्यताप्राप्त वारसास्थळ म्हणून संरक्षित असलेल्या जुने गोवे परिसरात हा प्रकार उघडकीस […]