ओडिशा महिला फुटबॉल संघ विजेता

वृत्तसंस्था/ कोलकाता अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या भुवनेश्वर येथे झालेल्या सातव्या महिलांच्या लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद ओडिशा महिला फुटबॉल संघाने पटकाविले. या स्पर्धेतील ओडिशाचे हे पहिलेच विजेतेपद आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ओडिशा एफसीने किक स्टार्ट एफसीचा 6-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये ओडिशा एफसी संघाने 2022 साली अंतिम फेरी […]

ओडिशा महिला फुटबॉल संघ विजेता

वृत्तसंस्था/ कोलकाता
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या भुवनेश्वर येथे झालेल्या सातव्या महिलांच्या लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद ओडिशा महिला फुटबॉल संघाने पटकाविले. या स्पर्धेतील ओडिशाचे हे पहिलेच विजेतेपद आहे.
भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ओडिशा एफसीने किक स्टार्ट एफसीचा 6-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये ओडिशा एफसी संघाने 2022 साली अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात ओडिशा संघातर्फे लिंडा कॉमने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली. तिने या सामन्यात 11 व्या, 66 व्या आणि 77 व्या मिनिटाला असे 3 गोल केले. पॅरी झेकाने 13 व्या आणि 22 व्या मिनिटाला 2 गोल तर कार्तिका अंगमुथूने 58 व्या मिनिटाला 1 गोल केला. या सामन्यात किक स्टार्ट एफसी संघाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही.
ओडिशा संघाने 12 सामन्यातून 31 गुण मिळवित अखेर जेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत गोकुळाम केरळचा संघ 29 गुणासह दुसऱ्या स्थानावर राहिला. ओडिशा महिला संघाने सरस गोल सरासरीच्या जोरावर गोकुळाम केरळला मागे टाकले.