तहसीलदार कार्यालयात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

मनपा लक्ष देणार का? बंदोबस्त करण्यासाठी सूचना करण्याची नागरिकांतून मागणी बेळगाव : रिसालदार गल्ली येथील जुन्या महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आवारामध्ये ठाण मांडून बसणाऱ्या कुत्र्यांपासून जीव मुठीत घेऊन नागरिकांना वावरावे लागत आहे. याकडे मनपाने लक्ष देऊन […]

तहसीलदार कार्यालयात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

मनपा लक्ष देणार का? बंदोबस्त करण्यासाठी सूचना करण्याची नागरिकांतून मागणी
बेळगाव : रिसालदार गल्ली येथील जुन्या महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आवारामध्ये ठाण मांडून बसणाऱ्या कुत्र्यांपासून जीव मुठीत घेऊन नागरिकांना वावरावे लागत आहे. याकडे मनपाने लक्ष देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी अपेक्षित यश आलेले नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांसह गल्लोगल्ली व सरकारी कार्यालयांच्या आवारामध्येही भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांपासून सावध राहून वावरावे लागत आहे.
कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक
सदर कार्यालयात बेळगाव वन सेवा उपलब्ध असल्याने पाणीपट्टी, घरपट्टी, विजेचे बिलसह सरकारच्या विविध योजनांसाठी केवायसी करण्याकरिता तसेच आधार कार्डसाठी येणाऱ्या नागरिकांची कायम वर्दळ असते. तसेच तहसीलदार कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचीही गर्दी असते. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक असून कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच भटकी कुत्री ठाण मांडून बसत आहेत. याकडे त्वरित लक्ष देऊन तहसीलदारांनी मनपाला त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सूचना करावी, अशी मागणी केली जात आहे.