व्यावसायिक वीजग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल

तक्रार निवारण बैठकीत ग्राहकांची नाराजी बेळगाव : वाढीव वीज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. घरगुती जोडणीला 200 युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा दिला जात असला तरी व्यावसायिक कनेक्शनला मात्र वाढीव बिले दिले जात आहे. काही ठिकाणी तर अरिअर्सच्या नावाखाली 20 ते 25 हजार रुपये दंड आकारला जात असल्याची तक्रार शनिवारच्या तक्रार निवारण बैठकीत ग्राहकांनी मांडली. हेस्कॉमची तक्रार […]

व्यावसायिक वीजग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल

तक्रार निवारण बैठकीत ग्राहकांची नाराजी
बेळगाव : वाढीव वीज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. घरगुती जोडणीला 200 युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा दिला जात असला तरी व्यावसायिक कनेक्शनला मात्र वाढीव बिले दिले जात आहे. काही ठिकाणी तर अरिअर्सच्या नावाखाली 20 ते 25 हजार रुपये दंड आकारला जात असल्याची तक्रार शनिवारच्या तक्रार निवारण बैठकीत ग्राहकांनी मांडली. हेस्कॉमची तक्रार निवारण बैठक शनिवारी प्रत्येक उपकेंद्रांवर पार पडली. शहरासह ग्रामीण भागातील उपकेंद्रांवर झालेल्या बैठकीमध्ये ग्राहकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. कणबर्गी येथील जगदीश पाटील यांचे व्यावसायिक कनेक्शन असून मर्यादेपेक्षा अधिक वीज वापरली म्हणून त्यांना 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे जगदीश पाटील यांनी तक्रार करत तीन महिने जादा वापर होत असेल तर यापूर्वीच का नाही सांगितले? अशी तक्रार दाखल केली. परंतु, वरिष्ठ अधिकारी नसल्याने आपण लवकरच उत्तर देऊ, असे हेस्कॉमकडून सांगण्यात आले. शहरातील रेल्वेस्टेशन व नेहरूनगर येथील उपकेंद्रांवर तर गांधीनगर येथील कार्यालयात ग्रामीण भागासाठी तक्रार निवारण बैठक पार पडली. तक्रारींची संख्या कमी असल्याने ग्राहकांची तितकीशी गर्दी नव्हती. यावेळी प्रभारी कार्यकारी अभियंता ए. एम. शिंदे, साहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद करुर, संजीव हम्मण्णावर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.