राज्यात नवी कृषी प्रशिक्षण केंद्रे स्थापणार
कृषीमंत्री चेलुवरायस्वामी यांची माहिती : उसावर होणाऱ्या रोगनियंत्रणासाठीही आवश्यक उपाययोजना राबविल्या जाणार
बेळगाव : राज्यामध्ये यावर्षी सात जिल्ह्यांमध्ये नवीन कृषी प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषीमंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी दिली. येथील सुवर्णविधानसौधमध्ये कृषी आणि सिंचन खात्याच्या विभागस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ते बोलत होते.शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठीच कृषी प्रशिक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत. विजापूर, यादगिरी, गदग, कोलार, चामराजनगर, रामनगर,उडुपी या जिल्ह्यांमध्ये ही नवीन कृषी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दर्जा राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कृषी खात्याच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन दर्जा राखण्यासाठी भर दिला जाईल. बैलहोंगल येथील प्रयोगालयाचा दर्जा वाढवण्याबरोबर नूतनीकरणासाठी कार्यवाही हाती घेतली जाईल.
उसावर होणाऱ्या रोगनियंत्रणासाठीही आवश्यक उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.उसावरील कीड नियंत्रणासाठी आवश्यक असणारे ट्रायकोग्रामा यामध्ये नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली.येत्या सहा महिन्यांमध्ये त्याचे अधिक प्रमाणात उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. बी-बियाणे, रासायनिक खते मागणीपेक्षा अधिक पुरवठा करण्यात आली आहेत. कोणताही गोंधळ न घालता वितरण करण्यात यावे. कृषी पत्तीन सहकारी संघांची मदत घेण्यात यावी. सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना करून देण्यात यावा. नवनवीन तंत्रज्ञान व आविष्काराची जागृती करण्यात यावी. त्याचा कृषीक्षेत्रामध्ये अवलंब करण्यासाठी प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृषी आयुक्त वाय. एस. पाटील, जलानयन खात्याचे आयुक्त गिरीश, संचालक पद्मय्या नायक, कृषी संचालक डॉ. जी. टी. पुत्र, अप्पर निर्देशक व्यंकटरामण रेड्डी आदी उपस्थित होते.
पीक विम्याबाबत प्रचार करावा
पीक विम्याबाबत अधिक प्रचार करण्यात यावा. नोंदणी वाढविण्यात यावी. याबरोबरच कृषी उत्पन्नामध्ये वाढ करून त्यांच्या मूल्याकडेही दखल घ्यावी. कृषीला लाभ मिळवून देणारा व्यवसाय म्हणून परिवर्तन करण्यात यावे, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी राज्यात नवी कृषी प्रशिक्षण केंद्रे स्थापणार
राज्यात नवी कृषी प्रशिक्षण केंद्रे स्थापणार
कृषीमंत्री चेलुवरायस्वामी यांची माहिती : उसावर होणाऱ्या रोगनियंत्रणासाठीही आवश्यक उपाययोजना राबविल्या जाणार बेळगाव : राज्यामध्ये यावर्षी सात जिल्ह्यांमध्ये नवीन कृषी प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषीमंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी दिली. येथील सुवर्णविधानसौधमध्ये कृषी आणि सिंचन खात्याच्या विभागस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ते बोलत होते.शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठीच कृषी प्रशिक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत. विजापूर, यादगिरी, गदग, कोलार, […]