मनपा आयुक्तांकडून कर्मचाऱ्यांची झाडाझडती

गैरहजर असलेल्यांच्या नावांची नोंद, कामकाज सुरळीत करण्याचे प्रयत्न बेळगाव : महानगरपालिकेतील विविध विभागातील कर्मचारी कामचुकारपणा करू लागले आहेत. अचानकपणे कार्यालयातून बाहेर गेल्यामुळे जनतेच्या तक्रारी वाढल्या. याची दखल महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी घेऊन शुक्रवारी दुपारी विविध विभागांना अचानक भेटी दिल्या. त्याठिकाणी गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची नोंद करून घेतली. यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.महानगरपालिकेमध्ये विविध विभाग आहेत. त्या विभागांमध्ये कर्मचारी सकाळी उपस्थित राहतात. […]

मनपा आयुक्तांकडून कर्मचाऱ्यांची झाडाझडती

गैरहजर असलेल्यांच्या नावांची नोंद, कामकाज सुरळीत करण्याचे प्रयत्न
बेळगाव : महानगरपालिकेतील विविध विभागातील कर्मचारी कामचुकारपणा करू लागले आहेत. अचानकपणे कार्यालयातून बाहेर गेल्यामुळे जनतेच्या तक्रारी वाढल्या. याची दखल महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी घेऊन शुक्रवारी दुपारी विविध विभागांना अचानक भेटी दिल्या. त्याठिकाणी गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची नोंद करून घेतली. यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.महानगरपालिकेमध्ये विविध विभाग आहेत. त्या विभागांमध्ये कर्मचारी सकाळी उपस्थित राहतात. मात्र, दुपारी अचानकपणे गायब होत आहेत.
त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागत आहे. काहीजण मोबाईलमध्येच गुंतून पडत आहेत. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. याची दखल आता मनपा आयुक्तांनी घेतली आहे. शुक्रवारी काही ठिकाणी विभागांमध्ये पाच ते सहा जण बसून राहिले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच हजेरी आयुक्तांनी घेतली. तातडीने तेथून काही कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला. बरेच कर्मचारी आपल्या जागेवर उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या नावाची नोंद करून घेतली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशाच प्रकारे यापुढेही अचानक विभागांना भेटी देऊन कामकाज सुरळीत चालावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.