नव्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामाला गती

बेळगावला मिळणार अत्याधुनिक विमानतळ : 322 कोटी रुपये मंजूर, सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था  बेळगाव : बेळगाव विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रवाशांची वाढती संख्या तसेच भविष्यातील विमानांची ये-जा लक्षात घेऊन अत्याधुनिक सेवासुविधा असणारे टर्मिनल उभे केले जात आहे. 322 कोटी रुपये खर्चून 19 हजार 600 चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये नवे टर्मिनल उभारले जात आहे. त्यामुळे बेळगावला लवकरच सुसज्ज टर्मिनल उपलब्ध होणार […]

नव्या टर्मिनल बिल्डिंगच्या कामाला गती

बेळगावला मिळणार अत्याधुनिक विमानतळ : 322 कोटी रुपये मंजूर, सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था 
बेळगाव : बेळगाव विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रवाशांची वाढती संख्या तसेच भविष्यातील विमानांची ये-जा लक्षात घेऊन अत्याधुनिक सेवासुविधा असणारे टर्मिनल उभे केले जात आहे. 322 कोटी रुपये खर्चून 19 हजार 600 चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये नवे टर्मिनल उभारले जात आहे. त्यामुळे बेळगावला लवकरच सुसज्ज टर्मिनल उपलब्ध होणार आहे. बेळगावपासून 10 कि. मी. अंतरावर असणाऱ्या सांबरा गावामध्ये 755 एकर जागेत बेळगाव विमानतळ वसले आहे. कोड-8 अंतर्गत हे विमानतळ येते.
या विमानतळामध्ये सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या असणारे टर्मिनल हे 3600 चौरस मीटर क्षेत्रफळात असून वर्षाला 6.9 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 2 लाख 9 हजार प्रवाशांनी विमानतळामधून प्रवास केल्याची नोंद करण्यात आली होती. प्रवाशांची संख्या वाढल्याने टर्मिनल बिल्डिंग अपुरी पडत आहे. सध्या एकाचवेळी 640 प्रवासी हाताळण्याची टर्मिनलची क्षमता आहे. ही क्षमता नव्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये वाढविली जाणार आहे. एकूण 2400 प्रवासी प्रवास करतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या टर्मिनलच्या पायाभरणी कार्यक्रमाचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले होते.
माती काढण्यासह काँक्रिट घालण्याचे काम सुरू
बेळगाव विमानतळ परिसरात अत्याधुनिक सेवा-सुविधा असणारे जादा प्रवासी हाताळणारे टर्मिनल बिल्डिंग उभारले जात आहे. सध्या माती काढणे, तसेच काँक्रिट घालण्याचे काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने टर्मिनल बिल्डिंगचे काम असून लवकरच एक हायटेक टर्मिनल बिल्डिंग बेळगावला उपलब्ध होईल.
– त्यागराजन (संचालक बेळगाव विमानतळ)