घाटकोपर होर्डींग अपघातातील मृत्यूचा आकडा १४ वर! ७४ जखमी; गुन्हा दाखल

मुंबईतील घाटकोपर येथे काल सोमवारी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यातून तयार झालेल्या धुळीच्या वादळाचा तडाखा बसल्याने ७० मीटर लांबीचा फलक कोसळला. या दुर्दैवी घटनेमध्ये पहिल्यांदा ३ लोक मृत्युमुखी पडल्याची बोतमी बाहेर आली त्यानंतर आज तो आकडा वाढून १४ वर पोहचला आहे. मृत्युचा आकडा वाढल्य़ाने तातडीने चेड्डानगर जंक्शन येथील पेट्रोल पंपावर असलेल्या या होर्डिंग्जच्या संबंधितांवर […]

घाटकोपर होर्डींग अपघातातील मृत्यूचा आकडा १४ वर! ७४ जखमी; गुन्हा दाखल

मुंबईतील घाटकोपर येथे काल सोमवारी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यातून तयार झालेल्या धुळीच्या वादळाचा तडाखा बसल्याने ७० मीटर लांबीचा फलक कोसळला. या दुर्दैवी घटनेमध्ये पहिल्यांदा ३ लोक मृत्युमुखी पडल्याची बोतमी बाहेर आली त्यानंतर आज तो आकडा वाढून १४ वर पोहचला आहे. मृत्युचा आकडा वाढल्य़ाने तातडीने चेड्डानगर जंक्शन येथील पेट्रोल पंपावर असलेल्या या होर्डिंग्जच्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल सायंकाळी झालेल्या घटनेनंतर अनेक गाड्या अडकल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाकडून जोरदार बचाव कार्य राबवण्यात आले. एकुण ६४ जणांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात येऊन उऱलेल्यांना रात्रभर होर्डिंगच्या खालून काढण्याचे प्रयत्न चालू होते. पेट्रोल पंपावरच झालेल्या दुर्घटनेमुळे एनडीआरएफला बोलावण्यात आले असून काल रात्रभर पावसामुळे आणि धुळीमुळे बचावकार्य करताना अडचणी येत होत्या.
या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत तसेच जखमींना उपचार देण्याची घोषणा केली.
मुंबई महानगरपालीकेने काल जारी केलेल्या निवेदनामध्ये याची माहीती देताना अजून २० ते ३० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली होती. महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, बेकायदेशीरपणे हा होर्डिंग लावण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण बीएमसीने दिले आहे. महापालिकेच्या निवेदनानंतर मुंबई पोलिसांनी पंतनगर पोलिस ठाण्यात होर्डींगच्या मालक भावेश भिडे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या दुर्दैवी घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त होत असून राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या X या सोशलमीडीयावर, “मुंबईच्या घाटकोपर भागात होर्डिंग कोसळल्यामुळे अनेक लोकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून शोक व्यक्त करते. मी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.