‘सन ऑफ सरदार 2’मध्ये मृणाल
स्कॉटलंडमध्ये सुरू होणार चित्रिकरण
2012 मध्ये प्रदर्शित ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाचा सीक्वेल ‘सन ऑफ सरदार 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि संजय दत्त हे कलाकार असतील, परंतु सोनाक्षी सिन्हा नसणार आहे. सोनाक्षीऐवजी या चित्रपटात नव्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे.
अजय देवगण आणि संजय दत्त यांच्या 2012 मधील विनोदी चित्रपट ‘सन ऑफ सरदार’चा सीक्वेल तयार केला जात आहे. यात संजय आणि अजय हे दोघेही पुन्हा बिल्लू आणि जस्सी या भूमिकांमध्ये दिसून येतील. परंतु यावेळी कहाणी नवी असणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच स्कॉटलंडमध्ये सुरू होणार आहे. अजय आणि संजय पुन्हा एकदा विनोदी भूमिकेत दिसून येतील.
सन ऑफ सरदार 2 चित्रपटात सोनाक्षीऐवजी मृणाल ठाकूर दिसून येणार आहे. मृणाल ही अजय देवगणच्या नायिकेची भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी मृणालवर भरवसा दाखविला आहे. चित्रपटाचे चित्रिकरण स्कॉटलंडमध्ये 50 दिवसांपर्यंत चालणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा करणार आहेत.
Home महत्वाची बातमी ‘सन ऑफ सरदार 2’मध्ये मृणाल
‘सन ऑफ सरदार 2’मध्ये मृणाल
स्कॉटलंडमध्ये सुरू होणार चित्रिकरण 2012 मध्ये प्रदर्शित ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाचा सीक्वेल ‘सन ऑफ सरदार 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि संजय दत्त हे कलाकार असतील, परंतु सोनाक्षी सिन्हा नसणार आहे. सोनाक्षीऐवजी या चित्रपटात नव्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. अजय देवगण आणि संजय दत्त यांच्या 2012 मधील विनोदी चित्रपट […]