सासूने जावयाची टूथपेस्ट वापरली,जावयाने केले असे काही…

कुटुंबात लहानमोठे भांडण होतच असतात. पण कधी कधी हे भांडण इतके जीवघेणे ठरतात की संपूर्ण कुटुंबच विस्कळीत होते. अशीच एक घटना सोशल मीडियावर वेगाने फिरत आहे.

सासूने जावयाची टूथपेस्ट वापरली,जावयाने केले असे काही…

कुटुंबात लहानमोठे भांडण होतच असतात. पण कधी कधी हे भांडण इतके विकोपाला जातात की संपूर्ण कुटुंबच उध्वस्त होते. अशीच एक घटना सध्या व्हेनिस मध्ये घडली आहे. एका पतीने आपल्या सासूची खासगी आयुष्यात होणाऱ्या ढवळाढवळला कंटाळून पत्नीला घटस्फोट देण्याचा विचार करत तिला नोटीस बजावली.

 

 एका व्यक्तीने आपल्या सासूवर नाराज होऊन पत्नी आणि मुलीला सोडून दिले. सासूची चूक एवढीच होती की तिने आपल्या जावयाची टूथपेस्ट वापरली  होती.

 

आपल्या पोस्टमध्ये, 38 वर्षीय व्यक्तीने लिहिले की तो आणि त्याची 35 वर्षीय पत्नी आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह इटलीतील व्हेनिसला जाण्याचा खूप दिवसांपासून विचार करत होते. पत्नीने आग्रह करून आपल्या आईला देखील सोबत नेले. तिथं गेल्यावर पतीला कळाले की पत्नीने एकच रूम बुक केले होते. त्यात मुलगी आणि माझी सासू देखील राहत होती. 

नंतर सासूने मुली आणि जावयाचा वस्तू वापरण्यास सुरु केले. त्याच्या सासूने आपल्या पत्नीचे फेस वॉश, शैम्पू आणि लोशन यासारखे “महागडे” उत्पादने सामायिक करताना पाहून तो दुःखी होता. जावयाचा संताप तेव्हा झाला जेव्हा सासूने त्याची टूथपेस्ट वापरली. त्याने सासूला असे करू नका म्हणत समजावले या वरून पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. 

रागाच्या भरात येत जावयाने सहल मध्येच सोडून पत्नी आणि मुलीला एकटे टाकून घरी परत येण्यासाठी एअर तिकीट बुक केली आणि घरी परतला.पत्नीने त्याला अनेकवेळा फोन केला पण त्याने उत्तर दिले नाही. त्यांनी आता विभक्त होण्याचा विचार केला आहे. 

 

या कुटुंबातील वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला जेव्हा त्या व्यक्तीने कबूल केले की त्याने आपल्या पत्नी आणि मुलीला युरोपमध्ये सोडले कारण त्याने आपल्या सासूची टूथपेस्ट वापरली होती. या व्यक्तीला त्याच्या कृत्याबद्दल सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला.

Edited by – Priya Dixit   

Go to Source