विवाहित पुरुषावर प्रेम करणे जीवावर बेतले, पत्नीने पतीच्या प्रेयसीला जिवंत जाळले

तिरुवल्लूर जिल्ह्यात घडलेल्या धक्कादायक घटनेवरून विवाहबाह्य प्रेमसंबंध किती महागात पडू शकतात, याचा अंदाज येतो. चेन्नईच्या सरकारी किलपॉक मेडिकल कॉलेजमध्ये दाखल महिलेचा मृत्यू चर्चेचा विषय ठरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या महिलेचे एका विवाहित पुरुषासोबत …

विवाहित पुरुषावर प्रेम करणे जीवावर बेतले, पत्नीने पतीच्या प्रेयसीला जिवंत जाळले

तिरुवल्लूर जिल्ह्यात घडलेल्या धक्कादायक घटनेवरून विवाहबाह्य प्रेमसंबंध किती महागात पडू शकतात, याचा अंदाज येतो. चेन्नईच्या सरकारी किलपॉक मेडिकल कॉलेजमध्ये दाखल महिलेचा मृत्यू चर्चेचा विषय ठरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार या महिलेचे एका विवाहित पुरुषासोबत अफेअर होते. या व्यक्तीच्या पत्नीने पतीच्या प्रेयसीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले होते.

 

काय होतं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय सुरेशचे राजेश्वरी नावाच्या महिलेसोबत गेल्या 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुरेश आधीच विवाहित असून, त्याला दोन मुलं आहेत. सुरेश भाजीविक्रेता म्हणून काम करतो, राजेश्वरीला देखील त्याने भाजीचे दुकानही उघडून दिले होते. सुरेशच्या पत्नीला त्यांच्या नात्याची माहिती मिळताच तिने दोघांनाही सावध केले. पोलिसांनी सांगितले की, सुरेशच्या पत्नीने राजेश्वरीला बाजारापासून दूर राहण्यास सांगितले होते.

 

तरीही दोघे भेटत राहिले

राजेश्वरीच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी उघडकीस आल्या, पोलिसांनी पुढे सांगितले की, “पत्नीच्या इशाऱ्यानंतर दोघेही जवळपास 6 महिने एकमेकांपासून दूर राहिले पण राजेश्वरी पुन्हा दुकानात येऊ लागली. पार्वतीला हे आवडले नाही, त्यानंतर ती 9 ऑगस्ट रोजी भाजी मंडीत पोहोचली, त्यावेळी पार्वतीच्या हातात पेट्रोलने भरलेली बाटली होती. दरम्यान पार्वतीने राजेश्वरीच्या अंगावर पेट्रोलची बाटली ओतली आणि नंतर तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ठिणगी पडल्याने राजेश्वरीच्या साडीला आग लागली. या हल्ल्यात महिलेच्या शरीराचा 80 टक्के भाग भाजला आहे.

 

महिलेच्या मृत्यूपूर्वी पार्वतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र राजेश्वरीच्या मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये पार्वतीसह 6 जणांची नावे आहेत.

Go to Source