डिजिटल लॉकरचा अधिकाऱ्यांकडून गैरवापर

डिजिटल लॉकरचा अधिकाऱ्यांकडून गैरवापर

केएसआर पक्षातर्फे जि. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून डिजिटल लॉकरचा बेकायदेशीर उपयोग केला जात असून त्यामुळे अनेक गैरकारभार घडले आहेत. याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कर्नाटक राष्ट्रीय समिती पक्षातर्फे जि. पं. कार्यालयावर मोर्चा काढून करण्यात आली. बैलहोंगल तालुक्यातील मागासवर्गीय कल्याण खात्याच्या डिजिटल लॉकरचा गैरवापर केला असल्याचे वृत्त आहे. याबाबत वृत्तवाहिन्यांवर या संदर्भातील वृत्त प्रसारित केले जात आहे. मागासवर्गीय कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून निधीचा गैरवापर केला असल्याचा आरोप सदर संघटनेकडून करण्यात आला.
याबाबत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. तत्कालीन बैलहौंगल तालुका मागासवर्गीय कल्याण अधिकारी शांतव्वा मरिगौडर यांची धारवाड येथे बदली झाल्यानंतर डिजिटल लॉकरचा उपयोग करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन याची चौकशी करावी. यासाठी पाच सदस्य कमिटीची रचना करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी निवेदन स्वीकारून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. संबंधितांवर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिले.