मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांची सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानला भेट

बेळगाव : महिला आणि बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सौंदत्ती यल्लम्मा रेणुका देवस्थानला भेट देऊन दर्शन घेतले. सर्वांना सुख समृद्धी लाभो, अशी प्रार्थना करून आशीर्वाद घेतला. मंत्री हेब्बाळकर यांनी देवीचे दर्शन घेऊन राज्यातील जनतेला सुख समृद्धी लाभो, यंदा चांगला पाऊस होऊन राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना समृद्धी लाभू दे, जनावरांसाठी पीक पाणी उपलब्ध होवो, अशी प्रार्थना त्यांनी […]

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांची सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानला भेट

बेळगाव : महिला आणि बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सौंदत्ती यल्लम्मा रेणुका देवस्थानला भेट देऊन दर्शन घेतले. सर्वांना सुख समृद्धी लाभो, अशी प्रार्थना करून आशीर्वाद घेतला. मंत्री हेब्बाळकर यांनी देवीचे दर्शन घेऊन राज्यातील जनतेला सुख समृद्धी लाभो, यंदा चांगला पाऊस होऊन राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना समृद्धी लाभू दे, जनावरांसाठी पीक पाणी उपलब्ध होवो, अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी आमदार विश्वनाथ वैद्य, उमेश बाळीग, बी. एन. प्रभुण्णावर, नासीब भागोजीकोप्प, अमीर गुरीनाईक, महाराज गौड्रू आदी उपस्थित होते.