मंत्री बाबूश मोन्सेरात यांना हृदयविकाराचा झटका

रात्रीच झाली एन्जिओप्लास्टी : गोमेकॉत उपचारांनंतर प्रकृती स्थिर पणजी : महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना रविवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर त्याच रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास एन्जिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. त्यांची प्रकृत्ती उत्तम असून केवळ त्यांना आराम […]

मंत्री बाबूश मोन्सेरात यांना हृदयविकाराचा झटका

रात्रीच झाली एन्जिओप्लास्टी : गोमेकॉत उपचारांनंतर प्रकृती स्थिर
पणजी : महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना रविवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर त्याच रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास एन्जिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. त्यांची प्रकृत्ती उत्तम असून केवळ त्यांना आराम मिळावा म्हणून गोमेकॉत ठेवण्यात आल्याचे बांदेकर यांनी सांगितले. बाबूश यांच्या पत्नी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी बाबूश यांची प्रकृती  स्थिर असल्याचे सांगितले. बाबूश तसे सक्रियच होते. ते दोन दिवसांपूर्वी मिरामार येथे श्रीहनुमान मंदिरात साफसफाईच्या कार्यक्रमात सहभागी झाले. रविवारी रात्री अचानक छातीत कळा येत असल्याचे त्यांनी घरच्या मंडळीला सांगितल्यावर त्यांना उपचारासाठी गोमेकॉत हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने एन्जिओप्लास्टी केली. गोमेकॉत सध्या ते तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.