चव्हाट गल्लीतील समस्येची महापौर-उपमहापौरांकडून दखल
बेळगाव : चव्हाट गल्ली परिसरात ड्रेनेज मिश्रीत पाणीपुरवठा केला जात आहे. त्याबाबत मनपाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्याची दखल घेत महापौर सविता कांबळे व उपमहापौर आनंद चव्हाण हे शुक्रवारी दाखल होवून त्यांनी तातडीने ही समस्या सोडविण्याची सूचना मनपा आणि एल अॅण्ड टीच्या अधिकाऱ्यांना केली. चव्हाट गल्ली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याबाबत मनपाला निवेदनही देण्यात आले. तरीदेखील त्याची दखल घेतली गेली नाही. मात्र आता महापौर व उपमहापौरांनी दखल घेवून ती समस्या सोडविण्यास अधिकाऱ्यांना सूचना केली. यावेळी या प्रभागाचे नगरसेवक सोहेल संगोळ्ळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी चव्हाट गल्लीतील समस्येची महापौर-उपमहापौरांकडून दखल
चव्हाट गल्लीतील समस्येची महापौर-उपमहापौरांकडून दखल
बेळगाव : चव्हाट गल्ली परिसरात ड्रेनेज मिश्रीत पाणीपुरवठा केला जात आहे. त्याबाबत मनपाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्याची दखल घेत महापौर सविता कांबळे व उपमहापौर आनंद चव्हाण हे शुक्रवारी दाखल होवून त्यांनी तातडीने ही समस्या सोडविण्याची सूचना मनपा आणि एल अॅण्ड टीच्या अधिकाऱ्यांना केली. चव्हाट गल्ली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी […]