मराठा आरक्षण : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दहावा दिवस

मनोज जरांगे हे राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतरणाची मागणी घेऊन पुन्हा आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळली असून त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानंतर शासकीय …

मराठा आरक्षण : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दहावा दिवस

मनोज जरांगे हे राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतरणाची मागणी घेऊन पुन्हा आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळली असून त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानंतर शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली उपचार होत आहे. 

मराठा आरक्षण अध्यादेश बाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार ने 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची घोषणा केली असून मनोज जरांगे पाटील यांनी देखील राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. या बद्दल मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या बांधवाना आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. 

 

मनोज जरंगे यांनी सगे सोयरे अध्यादेश लागू व्हावे या साठी 10 फेब्रुवारी पासून उपोषणाला बसले आहे. त्यांनी 20 फेब्रुवारी पर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. त्यांनी गेल्या 10 दिवसापासून अन्न पाण्याचा घेण्यास नकार दिला असून त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या नाकातून रक्त येत होते. त्यांना काही लोकांनी पाणी घेण्याचा आग्रह केल्यावर त्यांनी पाणी घेतले होते. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मात्र न्यायालयाने उपचार घेण्याचे आदेश दिल्यावर त्यांनी उपचार घेतले. 

 

 Edited by – Priya Dixit

 

Go to Source