हजारो भाविकांच्या उपस्थितीत मण्णीकेरी श्री महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ

देवीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात : धनगरी ढोलवादनाच्या गजरात थाटात रथोत्सव वार्ताहर /कडोली हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री लक्ष्मीदेवीचा जय जयकार करत मण्णीकेरी येथील श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. धनगरी ढोलाच्या गजरात रथोत्सवही अपूर्व उत्साहात पार पडला. बुधवारी सूर्योदयाला डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या विवाह सोहळ्याचा भाग्याचा क्षण उपस्थित भाविकांनी अनुभवला. पै पाहुण्यांच्या वर्दळीने […]

हजारो भाविकांच्या उपस्थितीत मण्णीकेरी श्री महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ

देवीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात : धनगरी ढोलवादनाच्या गजरात थाटात रथोत्सव
वार्ताहर /कडोली
हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री लक्ष्मीदेवीचा जय जयकार करत मण्णीकेरी येथील श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. धनगरी ढोलाच्या गजरात रथोत्सवही अपूर्व उत्साहात पार पडला. बुधवारी सूर्योदयाला डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या विवाह सोहळ्याचा भाग्याचा क्षण उपस्थित भाविकांनी अनुभवला. पै पाहुण्यांच्या वर्दळीने संपूर्ण गाव फुलून गेला आहे. तब्बल 21 वर्षांनंतर ही यात्रा होत असल्याने गावकऱ्यांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यात्र कमिटीचे अध्यक्ष सदानंद कालकुंद्रीकर, सदस्य सतीश खजगोनट्टी, मलाप्पा दड्डीकर, भरमा सनदी, मारुती सनदी, सुरेश सनदी, पुंडलिक खजगोनट्टी, बाळू गुणाजी, यलाप्पा सनदी आणि हक्कदार यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.
रथोत्सव उत्साहात
श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर सकाळी 10 वा. धनगरी ढोलाच्या गजरात आणि भंडाराच्या उधळणीत श्री महालक्ष्मी देवीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या मिरवणुकीसाठी आकर्षक असा रथ सजविण्यात आला होता. सदर मिरवणूक मारुती गल्लीमार्गे शाळेच्या आवारात आली. आणि त्याठिकाणी श्री महालक्ष्मी देवी गदगेवर स्थानापन्न करण्यात आली. या मिरवणुकीत लहान-थोर मंडळींसह महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन रथ ओढण्यासाठी सहकार्य केले. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश एम. आणि सहकारी प्रयत्न करीत आहेत. यावेळी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते रथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.