मणिशंकर अय्यरांमुळे काँग्रेसची पुन्हा कोंडी
1962 च्या युद्धासंबंधी वक्तव्य
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी 1962 मध्ये चीनकडून झालेल्या आक्रमणासाठी ‘कथित’ शब्दाचा वापर केल्याप्रकरणी मंगळवारी माफी मागितली आहे. ऑक्टोबर 1962 मध्ये चिनींनी कथित स्वरुपात भारतावर आक्रमण केले होते, असे अय्यर यांनी फॉरेन कॉरेस्पॉडेंट्स क्लबमध्ये एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. अय्यर यांचे हे वक्तव्य संशोधनवादाचा लाजिरवाणा प्रयत्न असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. तर काँग्रेसने अय्यर यांच्या या टिप्पणीपासून स्वत:चे अंग झटकले आहे. अय्यर यांनी बिनशर्त माफी मागितल्याने हा मुद्दा संपुष्टात यावा, असे काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. यापूर्वी 15 एप्रिल रोजी अय्यर यांनी भारताने पाकिस्तानचा आदर करावा, पाकिस्तानकडे अण्वस्त्रs असल्याचे लक्षात ठेवावे असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. काँग्रेस नेते अय्यर आता 1962 च्या चिनी आक्रमणाला खोटे ठरवू पाहत आहेत. 1962 च्या युद्धानंतर चीनने भारताच्या 38 हचार चौरस किलोमीटर क्षेत्रावर अवैध कब्जा केला होता, अशी टीका मालवीय यांनी केली.
Home महत्वाची बातमी मणिशंकर अय्यरांमुळे काँग्रेसची पुन्हा कोंडी
मणिशंकर अय्यरांमुळे काँग्रेसची पुन्हा कोंडी
1962 च्या युद्धासंबंधी वक्तव्य वृत्तसंस्था /नवी दिल्ली काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी 1962 मध्ये चीनकडून झालेल्या आक्रमणासाठी ‘कथित’ शब्दाचा वापर केल्याप्रकरणी मंगळवारी माफी मागितली आहे. ऑक्टोबर 1962 मध्ये चिनींनी कथित स्वरुपात भारतावर आक्रमण केले होते, असे अय्यर यांनी फॉरेन कॉरेस्पॉडेंट्स क्लबमध्ये एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. अय्यर यांचे हे वक्तव्य संशोधनवादाचा लाजिरवाणा प्रयत्न असल्याची टीका […]