दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गोडधोडाचा बेत पूर्ण करण्यासाठी मलाईदार आणि दाट बासुंदी हा एक उत्तम पर्याय आहे. अगदी हलवाईसारखी दाट, लच्छेदार आणि चविष्ट बासुंदी घरच्या घरी बनवण्यासाठी खालील सोपी पद्धत वापरा:
साहित्य-
म्हशीचे पूर्ण मलाई असलेले दूध : १.५ लिटर
साखर: ३/४ वाटी (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
वेलची आणि जायफळ पूड: १ लहान चमचा
ड्रायफूट्स: २ मोठे चमचे (बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप)
केशर: १० ते १२ काड्या (२ चमचे कोमट दुधात भिजवलेल्या)
चारोळी: १ चमचा
ALSO READ: दसर्याला गिलकीचे काय महत्त्व? गिलक्याची भजी कशी बनवायची जाणून घ्या
कृती-
दूध आटवणे:जाड बुडाच्या कढईत (किंवा पसरट भांड्यात) १ छोटा चमचा पाणी टाका आणि त्यावर १.५ लिटर दूध घाला (पाण्यामुळे दूध तळाला करपत नाही).दूध मध्यम आचेवर उकळू द्या. उकळी आल्यावर गॅस मध्यम-मंद करा.
साय बाजूला करणे (लच्छेदार टेक्चरसाठी):दूध उकळत असताना त्यावर येणारी मलाई/साय चमच्याने कढईच्या बाजूला (काठांवर) चिटकवत राहा.दूध निम्मे होईपर्यंत (अर्धे आटेपर्यंत) सतत ढवळत राहा आणि कढईच्या तळाला दूध करपू देऊ नका.
केशर व ड्रायफूट्स घालणे:दूध छान घट्ट झाल्यावर कढईच्या काठावर जमा केलेली सगळी मलाई खरवडून पुन्हा दुधात टाका.आता यात केशरयुक्त दूध, कापलेले ड्रायफूट्स आणि चारोळी घालून आणखी ५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या.
साखर व वेलची पूड:शेवटी साखर आणि वेलची-जायफळ पूड घाला. साखर विरघळल्यानंतर ३ ते ४ मिनिटे उकळू द्या आणि गॅस बंद करा. (बासुंदी थंड झाल्यावर अजून घट्ट होते, त्यामुळे खूप जास्त आटू देऊ नका).गरमागरम किंवा फ्रिजमध्ये थंड करून वरून ड्रायफूट्सच्या कापांनी सजवून बासुंदी सर्व्ह करा.
ALSO READ: दसऱ्याच्या जेवणात काय बनवावे? बटाट्याची भाजी, पुरी आणि गोड पदार्थांचा खास मेन्यू
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: दसरा स्पेशल संपूर्ण थाळी मेनू