उन्हाळ्यात थंडाव्यासाठी बनवा सातूचे सरबत

उन्हाळ्यात थंडाव्यासाठी बनवा सातूचे सरबत

सध्या मे चा महिना सुरु असून उकाड्याने सर्व जण हैराण झाले आहे. उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव कर्यासाठी लोकांना घरातून कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे.  उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी सातूचे शरबत पिणे खूप फायदेशीर मानले जाते. 

सातू शरीरासाठी फायदेशीर असून या मध्ये प्रथिनाशिवाय फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह देखील मुबलक प्रमाणात आढळते. उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सातूचे शरबत बनवू शकता. चला साहित्य आणि कृती जाणून घ्या.

 

साहित्य –

 सातू, पाणी, पिठी साखर, काजू, बदाम, 

 

कृती- 

सर्वप्रथम एका भांड्यात सातूचे पीठ घ्या त्यात पाणी घालून पातळ घोळ तयार करा. आता त्यात पिठी साखर मिसळा वरून चिरलेले बदाम, आणि काजू घालून बर्फाचे खडे घाला. थंडगार सातूचे शरबत ग्लासात सर्व्ह करा. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

 

 Edited by – Priya Dixit