महिंद्रा लाईफस्पेसने घेतली 9 एकर जागा
बेंगळूर :
बांधकाम क्षेत्रातील कंपनी महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपमेंट लिमिटेड यांनी बेंगळूर जवळ 9.4 एकरची जमीन खरेदी केली आहे. या जमिनीवर कंपनी आगामी काळात बांधकाम प्रकल्प विकसित करणार आहे. या बांधकाम प्रकल्पातून कंपनीला 1700 कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो अशी माहिती कंपनीने दिली आहे. महिंद्रा समूहाने दिलेल्या माहितीनुसार बेंगळूरमधील व्हाईटफील्ड भागामध्ये कंपनीने सदरची जागा खरेदी केली असून त्यावर मध्यम प्रीमियम गटातील रहिवासी घरांची उभारणी केली जाणार आहे. कंपनीला बेंगळूरमध्येच आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा असून त्यादृष्टीने या शहरावरच कंपनीने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. सदरच्या नव्या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ लवकरच केला जाणार असून पहिल्या टप्प्यातील काम पुढील बारा महिन्यांमध्ये सुरू केले जाणार आहे.
Home महत्वाची बातमी महिंद्रा लाईफस्पेसने घेतली 9 एकर जागा
महिंद्रा लाईफस्पेसने घेतली 9 एकर जागा
बेंगळूर : बांधकाम क्षेत्रातील कंपनी महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपमेंट लिमिटेड यांनी बेंगळूर जवळ 9.4 एकरची जमीन खरेदी केली आहे. या जमिनीवर कंपनी आगामी काळात बांधकाम प्रकल्प विकसित करणार आहे. या बांधकाम प्रकल्पातून कंपनीला 1700 कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो अशी माहिती कंपनीने दिली आहे. महिंद्रा समूहाने दिलेल्या माहितीनुसार बेंगळूरमधील व्हाईटफील्ड भागामध्ये कंपनीने सदरची जागा खरेदी केली […]
