MSRTC कडून दिवाळीपूर्वी प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द केल्याची घोषणा केली आहे. दिवाळीमध्ये ही भाडेवाढ करण्यात येणार होती. ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत प्रवेश करणाऱ्या हलक्या मोटार वाहनांना टोलमाफीच्या घोषणेच्या अनुषंगाने केली आहे.  MSRTC ने  सणासुदीच्या काळात प्रवासांची वाढती गर्दी पाहता भाडे वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु यावर्षी, राज्य सरकारने भाडेवाढीचा प्रस्ताव नाकारला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएसआरटीसीच्या प्रशासनाने भाडेवाढीवर शिक्कामोर्तब केले होते. परंतु नंतर राज्य सचिवालयाने ते नाकारले. या निर्णयामुळे MSRTC वरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी पात्र कर्मचाऱ्यांना 40 कोटी रुपये बोनस देण्याची तयारी MSRTC करत आहे. पण भाडेवाढ रद्द केल्याने यावरही परिणाम होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  गेल्या वर्षी, MSRTC ने 8 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत अशीच भाडेवाढ लागू केली होती. 15,000 बसेसच्या ताफ्यासह, MSRTC ही भारतातील सर्वात मोठ्या परिवहन महामंडळांपैकी एक आहे, जी दररोज 5.5 दशलक्ष प्रवाशांना सेवा देते.हेही वाचा ठाणे : प्रवाशांना मोबाईल ॲपवरून बसचे तिकीट काढता येणारमेट्रो 2A आणि मेट्रो 7 तिकिटे आता व्हॉट्सॲपवर उपलब्ध

MSRTC कडून दिवाळीपूर्वी प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द केल्याची घोषणा केली आहे. दिवाळीमध्ये ही भाडेवाढ करण्यात येणार होती. ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत प्रवेश करणाऱ्या हलक्या मोटार वाहनांना टोलमाफीच्या घोषणेच्या अनुषंगाने केली आहे. MSRTC ने  सणासुदीच्या काळात प्रवासांची वाढती गर्दी पाहता भाडे वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु यावर्षी, राज्य सरकारने भाडेवाढीचा प्रस्ताव नाकारला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएसआरटीसीच्या प्रशासनाने भाडेवाढीवर शिक्कामोर्तब केले होते. परंतु नंतर राज्य सचिवालयाने ते नाकारले. या निर्णयामुळे MSRTC वरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी पात्र कर्मचाऱ्यांना 40 कोटी रुपये बोनस देण्याची तयारी MSRTC करत आहे. पण भाडेवाढ रद्द केल्याने यावरही परिणाम होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी, MSRTC ने 8 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत अशीच भाडेवाढ लागू केली होती. 15,000 बसेसच्या ताफ्यासह, MSRTC ही भारतातील सर्वात मोठ्या परिवहन महामंडळांपैकी एक आहे, जी दररोज 5.5 दशलक्ष प्रवाशांना सेवा देते.हेही वाचाठाणे : प्रवाशांना मोबाईल ॲपवरून बसचे तिकीट काढता येणार
मेट्रो 2A आणि मेट्रो 7 तिकिटे आता व्हॉट्सॲपवर उपलब्ध

Go to Source