भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश मधील कानपुर जिल्ह्यातील पनकी परिसरामध्ये जलद गतीने जाणाऱ्या दोन ट्रकच्या मध्ये एक कार अडकल्याने भीषण अपघात झाला आहे. तसेच या कार मध्ये एक खासगी इंजीनियरिंग कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांसोबत पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  हा अपघात तेव्हा झाला जेव्हा विद्यार्थी कॉलेजला जाण्यास निघाले होते. तसेच पोलीस अधिकारींनी सांगितले की, अपघात एवढा भीषण होता की, कार क्षतिग्रस्त झाली असल्याने कार कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघात चार विद्यार्थ्यांसोबत कार चालकाचा देखील मृत्यू झालेला आहे. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व कार मधून मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. तसेच पोलिसांनी सांगितले की, दोन्ही ट्रकचालक फरार आहे. पोलिसांनी दोन्ही ट्रक ताब्यात घेऊन ट्रकचालकांचा शोध सुरु केला आहे.    

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source