महाराष्ट्र : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या

महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत हत्या केली आहे. हा व्यक्ती महिलेच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा यामुळे दोघांमध्ये सारखे वाद निर्माण होत होते. याचदरम्यान या व्यक्तीने …

महाराष्ट्र : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या

महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत हत्या केली आहे.

हा व्यक्ती महिलेच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा यामुळे दोघांमध्ये सारखे वाद निर्माण होत होते. याचदरम्यान या व्यक्तीने राग अनावर झाल्याने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. 

 

महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक घटना घडली आहे. एका व्यक्तीने वाद झाल्याने राग अनावर होत स्वतःच्याच पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली. व केस दाखल करीत 46 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मनोर परिसरात दुर्वेश गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपी वारंवार पत्नीच्या चरित्रावर संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत असायचे. 

 

बुधवारी परत त्यांचे भांडण झाले. या या दरम्यान राग अनावर झाल्याने या व्यक्तीने महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृत्यदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला. व आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी पोलीस करीत आहे.

Edited By- Dhanashri Naik      

Go to Source