“बहीणीच्या विरोधात सुनेत्रा यांना उभं करायला नको होतं…” : अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांना बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करून चूक केल्याचे जाहीरपणे मान्य केले आहे.  अजित पवारांनी ज्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंकडून पराभव झाला होता. त्या निवडणुकीबाबत पवारांनी खंत व्यक्त केली आणि हा निर्णय राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळाने घेतल्याचेही नमूद केले. यावेळी अजित पवार यांनी कौटुंबिक संबंधांपासून राजकारण दूर ठेवण्यावर देखील भर दिला. ‘जय महाराष्ट्र’ या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. बारामतीची लाडकी बहीण आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, माझ्या सगळ्याच बहीणी लाडक्या आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी… पण माझ्या सगळ्या बहीणी लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण घरामध्ये शिरू द्यायचं नसतं. पण माझ्याकडून थोडीशी चूक झाली, मी माझ्या बहीणीच्या विरोधात सुनेत्रा यांना उभं करायला नको होतं. पण पार्लमेंट्री बोर्डाने निर्णय घेतला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं की तसं व्हायला नको होतं. राखी पौर्णीमेला जाणार का? याप्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या माझा राज्याचा दौरा सुरू आहे. पण त्या वेळेला मी तेथे असेल आणि बहीणीपण तेथे असतील तर मी तेथे जाणार असेही अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे या मतदारसंघात पवार कुटुंबातील दोन उमेदवार आमनेसामने आले होते. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. दोन्ही पक्षांकडून येथे जोर लावण्यात आला पण अखेर निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी 1 लाख 58 हजार मतांनी विजय मिळवला होता. यानंतर आता अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती असे मान्य केले आहे. दरम्यान सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचालींनी प्रचंड वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते सध्या राज्यात सभा घेत आहेत.हेही वाचा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गट ABVP विरुद्ध लढणारमहाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहराच नाही?
“बहीणीच्या विरोधात सुनेत्रा यांना उभं करायला नको होतं…” : अजित पवार


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांना बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करून चूक केल्याचे जाहीरपणे मान्य केले आहे. अजित पवारांनी ज्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळेंकडून पराभव झाला होता. त्या निवडणुकीबाबत पवारांनी खंत व्यक्त केली आणि हा निर्णय राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळाने घेतल्याचेही नमूद केले.यावेळी अजित पवार यांनी कौटुंबिक संबंधांपासून राजकारण दूर ठेवण्यावर देखील भर दिला. ‘जय महाराष्ट्र’ या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.बारामतीची लाडकी बहीण आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, माझ्या सगळ्याच बहीणी लाडक्या आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी… पण माझ्या सगळ्या बहीणी लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण घरामध्ये शिरू द्यायचं नसतं. पण माझ्याकडून थोडीशी चूक झाली, मी माझ्या बहीणीच्या विरोधात सुनेत्रा यांना उभं करायला नको होतं. पण पार्लमेंट्री बोर्डाने निर्णय घेतला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं की तसं व्हायला नको होतं.राखी पौर्णीमेला जाणार का? याप्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या माझा राज्याचा दौरा सुरू आहे. पण त्या वेळेला मी तेथे असेल आणि बहीणीपण तेथे असतील तर मी तेथे जाणार असेही अजित पवार म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे या मतदारसंघात पवार कुटुंबातील दोन उमेदवार आमनेसामने आले होते. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. दोन्ही पक्षांकडून येथे जोर लावण्यात आला पण अखेर निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी 1 लाख 58 हजार मतांनी विजय मिळवला होता. यानंतर आता अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती असे मान्य केले आहे.दरम्यान सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचालींनी प्रचंड वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांचे नेते सध्या राज्यात सभा घेत आहेत. हेही वाचामुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गट ABVP विरुद्ध लढणार
महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहराच नाही?

Go to Source