मध्य रेल्वेची प्रवाशांसाठीची डॉक्टर-ऑन-कॉल सेवा यशस्वी
मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी डॉक्टर्स ऑन कॉल (doctor on call) सेवा 24/7 वैद्यकीय सहाय्य उपक्रम सुरू केला आहे. एकप्रकारे आपत्कालीन वैद्यकीय सेवा वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊलमध्ये रेल्वेने उचलले आहे. 1 जून 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीत मध्य रेल्वेच्या (central railway) डॉक्टर ऑन कॉल टीमने उपस्थित राहून एकूण 2,019 प्रवाशांना वैद्यकीय मदत दिली आहे. यामध्ये नागपूर (nagpur) विभागातील 815, भुसावळ विभागातील 587, पुणे (pune) विभागातील 297, सोलापूर (solapur) विभागातील 236 आणि मुंबई (mumbai) विभागातील 84 प्रवाशांचा समावेश आहे.प्रवासी (passengers) वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या (medical emergency) परिस्थितीत तिकीट परीक्षक किंवा ट्रेन व्यवस्थापकाशी संपर्क साधून डॉक्टरांच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. ट्रेन कंडक्टर/ट्रेन मॅनेजर मार्फत पुढील येणाऱ्या स्टेशनच्या ऑन ड्युटी स्टेशन मॅनेजरला संदेश पाठवला जातो जिथे डॉक्टर आणि पॅरामेडिक्सची वैद्यकीय टीम हजर राहण्यासाठी तयार असते.वैद्यकीय मदत ताबडतोब पुरविली जाते आणि कोणतीही मोठी समस्या उद्भवल्यास प्रवासी जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय मदत घेऊ शकतात.मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस ट्रेन क्रमांक 22114 कोचुवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला छातीत दुखू लागले. त्यांच्या नातेवाइकांनी मदतीचे आवाहन केले. एलटीटीच्या उपस्टेशन अधिक्षकांनी वैद्यकीय पथकासह वेळेवर मदत केली आणि प्रवाशाला जवळच्या रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली. या प्रवाशाला वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने तो वाचला.दुसऱ्या प्रकरणात 6 जून 2024 रोजी 17412 कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या एका महिलेला ट्रेन लोणावळ्याहून सुटली तेव्हा तिला प्रसूती वेदना झाल्या. सीआर अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली, कर्जत येथे एक टीम तयार होती जिथे महिलेला रुग्णालयात नेण्यात आले जिथे तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला.आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर, 12293 लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेसच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी 3 एप्रिल 2024 रोजी सहप्रवाशाच्या मदतीने, एका महिलेला तिच्या बाळाला जन्म देण्यात मदत केली.अशा अनेक घटना आहेत ज्यात मध्य रेल्वेच्या (CR) टीमने गरजू प्रवाशांना या माध्यमातून मदत केली आहे.हेही वाचादोन महिन्यांत मुंबईत हंगामातील 90% पाऊसवांद्रे ते वेलंकनी दरम्यान विशेष ट्रेन धावणार
Home महत्वाची बातमी मध्य रेल्वेची प्रवाशांसाठीची डॉक्टर-ऑन-कॉल सेवा यशस्वी
मध्य रेल्वेची प्रवाशांसाठीची डॉक्टर-ऑन-कॉल सेवा यशस्वी
मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी डॉक्टर्स ऑन कॉल (doctor on call) सेवा 24/7 वैद्यकीय सहाय्य उपक्रम सुरू केला आहे. एकप्रकारे आपत्कालीन वैद्यकीय सेवा वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊलमध्ये रेल्वेने उचलले आहे.
1 जून 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीत मध्य रेल्वेच्या (central railway) डॉक्टर ऑन कॉल टीमने उपस्थित राहून एकूण 2,019 प्रवाशांना वैद्यकीय मदत दिली आहे. यामध्ये नागपूर (nagpur) विभागातील 815, भुसावळ विभागातील 587, पुणे (pune) विभागातील 297, सोलापूर (solapur) विभागातील 236 आणि मुंबई (mumbai) विभागातील 84 प्रवाशांचा समावेश आहे.
प्रवासी (passengers) वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या (medical emergency) परिस्थितीत तिकीट परीक्षक किंवा ट्रेन व्यवस्थापकाशी संपर्क साधून डॉक्टरांच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात.
ट्रेन कंडक्टर/ट्रेन मॅनेजर मार्फत पुढील येणाऱ्या स्टेशनच्या ऑन ड्युटी स्टेशन मॅनेजरला संदेश पाठवला जातो जिथे डॉक्टर आणि पॅरामेडिक्सची वैद्यकीय टीम हजर राहण्यासाठी तयार असते.
वैद्यकीय मदत ताबडतोब पुरविली जाते आणि कोणतीही मोठी समस्या उद्भवल्यास प्रवासी जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय मदत घेऊ शकतात.
मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस ट्रेन क्रमांक 22114 कोचुवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला छातीत दुखू लागले. त्यांच्या नातेवाइकांनी मदतीचे आवाहन केले.
एलटीटीच्या उपस्टेशन अधिक्षकांनी वैद्यकीय पथकासह वेळेवर मदत केली आणि प्रवाशाला जवळच्या रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली. या प्रवाशाला वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने तो वाचला.
दुसऱ्या प्रकरणात 6 जून 2024 रोजी 17412 कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या एका महिलेला ट्रेन लोणावळ्याहून सुटली तेव्हा तिला प्रसूती वेदना झाल्या. सीआर अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली, कर्जत येथे एक टीम तयार होती जिथे महिलेला रुग्णालयात नेण्यात आले जिथे तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला.
आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर, 12293 लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज दुरांतो एक्स्प्रेसच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी 3 एप्रिल 2024 रोजी सहप्रवाशाच्या मदतीने, एका महिलेला तिच्या बाळाला जन्म देण्यात मदत केली.
अशा अनेक घटना आहेत ज्यात मध्य रेल्वेच्या (CR) टीमने गरजू प्रवाशांना या माध्यमातून मदत केली आहे.हेही वाचा
दोन महिन्यांत मुंबईत हंगामातील 90% पाऊस
वांद्रे ते वेलंकनी दरम्यान विशेष ट्रेन धावणार