‘लोकमान्य’ म्युच्युअल फंडची भरारी
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘म्युच्युअल फंड वितरण व्यवसायाने एसआयपी आणि लमसम व्यवसाय क्षेत्रात प्रथम पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे. या संदर्भात निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड कंपनीच्या गोवा शाखेने पणजी-सांतइनेज येथील ‘सूर्यकिरण’मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचा सन्मान करण्यात आला. ‘निप्पॉन’चे क्लस्टर प्रमुख गॅब्रिएल मेन्डोन्सा आणि ज्येष्ठ व्यवस्थापक रहती सावंत यांच्या हस्ते सई ठाकुर-बिजलानी (संचालक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी) आणि प्रीतम बिजलानी (प्रमुख सल्लागार आणि प्रमुख मार्केटिंग अधिकारी) यांना चषक (ट्रॉफी) आणि मानचिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमाला विभागीय प्रमुख अग्नेलो कार्व्हालो (म्हापसा) आणि डॉम्निक डिसोझा (मुरगाव) म्युच्युअल फंडचे प्रमुख संदेश कुमठेकर आणि दोन्ही विभागांचे समन्वयक साव्हियो डिमेलो व योगिता घोटगे आदी मान्यवर उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी ‘लोकमान्य’ म्युच्युअल फंडची भरारी
‘लोकमान्य’ म्युच्युअल फंडची भरारी
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘म्युच्युअल फंड वितरण व्यवसायाने एसआयपी आणि लमसम व्यवसाय क्षेत्रात प्रथम पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे. या संदर्भात निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड कंपनीच्या गोवा शाखेने पणजी-सांतइनेज येथील ‘सूर्यकिरण’मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचा सन्मान करण्यात आला. ‘निप्पॉन’चे क्लस्टर प्रमुख गॅब्रिएल मेन्डोन्सा […]