ICSE ISC Result 2024: दहावी-बारावी परीक्षेचा निकाल
प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर CISCE बोर्डाने इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. यावेळीही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. प्राप्त माहितीनुसार, 2023-24 या वर्षासाठी ICSE (वर्ग 10) आणि ISC (वर्ग 12) विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षांचे निकाल भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा (CISCE) परिषदेने जाहीर केले आहेत. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर त्यांचे निकाल पाहू शकतात.
CISCE च्या अधिकृत वेबसाइटला cisce.org किंवा results.cisce.org वर भेट द्या.
मुख्यपृष्ठावर ICSE किंवा ISC बोर्ड परीक्षा निकाल 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
आता युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
तुमचा निकाल स्क्रीनवर उघडेल.
ऑनलाइन मार्कशीट डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
10वी मध्ये इयत्ता 99.47% (2,42,328) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, ISC 12वी मध्ये एकूण 98.19% (98,088) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उल्लेखनीय आहे की या वर्षी सुमारे 3 लाख उमेदवारांनी या परीक्षा दिल्या होत्या. ICSE विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.४७ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्णतेच्या टक्केवारीत किंचित वाढ झाली आहे. उमेदवार डिजीलॉकर आणि उमंग ॲपद्वारेही त्यांचा निकाल मिळवू शकतात.