‘नुवा’ डायमंड कलेक्शन विक्रीचा मलाबार गोल्डमध्ये शुभारंभ

अतिशय सुबक डिझाईनमध्ये आकर्षक दागिने उपलब्ध बेळगाव : मलाबार गोल्ड अँड डायमंडतर्फे ‘नुवा डायमंड कलेक्शन’चा शुभारंभ नुकताच करण्यात आला. कॉलेज रोड येथील मलाबारच्या शोरुममध्ये या नव्या कलेक्शनची सुरुवात करण्यात आली. प्रिया कुलकर्णी, श्रेया काटकर व स्वार्था मॅनेजमेंट टीम, शोरुमचे प्रमुख लिजेश के., आशिष मॅथ्यू, स्टोअर मॅनेजर सूरज अणवेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. नुवा या कलेक्शनमध्ये प्रत्येक दागिना हा […]

‘नुवा’ डायमंड कलेक्शन विक्रीचा मलाबार गोल्डमध्ये शुभारंभ

अतिशय सुबक डिझाईनमध्ये आकर्षक दागिने उपलब्ध
बेळगाव : मलाबार गोल्ड अँड डायमंडतर्फे ‘नुवा डायमंड कलेक्शन’चा शुभारंभ नुकताच करण्यात आला. कॉलेज रोड येथील मलाबारच्या शोरुममध्ये या नव्या कलेक्शनची सुरुवात करण्यात आली. प्रिया कुलकर्णी, श्रेया काटकर व स्वार्था मॅनेजमेंट टीम, शोरुमचे प्रमुख लिजेश के., आशिष मॅथ्यू, स्टोअर मॅनेजर सूरज अणवेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. नुवा या कलेक्शनमध्ये प्रत्येक दागिना हा अत्यंत कुशलतेने व सुबक पद्धतीने घडवण्यात आला आहे. त्यांचे सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित करणारे आहे. यातील कोणताही दागिना परिधान केल्यानंतर महिलांचे सौंदर्य खुलून दिसणारे आहे. मलाबारच्या भारतातील सर्व शोरुम्समध्ये हे दागिने उपलब्ध आहेत. मलाबार ग्रुपचे चेअरमन एम. पी. अहमद म्हणाले, महिलांसाठी विशेष दागिन्यांची मालिका मलाबार गोल्डने सुरू केली आहे. महिलांचे नैसर्गिक सौंदर्य वाढविण्यासाठी हे दागिने महत्त्वाचे ठरणार आहेत. मलाबारमधून दागिने खरेदी करणे ही महिलांसाठी प्रतिष्ठेची बाब असून मलाबारवरील विश्वास हा आमच्यासाठी प्रोत्साहन वाढविणारा आहे,असे त्यांनी सांगितले.