लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत दाखल

वृत्तसंस्था /जकार्ता विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या इंडोनेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना जपानच्या निशीमोटोचा पराभव केला. पुरुष एकेरीच्या गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात लक्ष्य सेनने निशीमोटोचा 21-9, 21-15 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. मात्र महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे आव्हान […]

लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत दाखल

वृत्तसंस्था /जकार्ता
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या इंडोनेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना जपानच्या निशीमोटोचा पराभव केला. पुरुष एकेरीच्या गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात लक्ष्य सेनने निशीमोटोचा 21-9, 21-15 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. मात्र महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे आव्हान संपुष्टात आले. जपानच्या मायू मासूमोटो आणि वेकना नेगाहेरा यांनी जॉली आणि गोपीचंद यांचा 19-21, 21-19, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचप्रमाणे भारताच्या तनिषा क्रेस्टो आणि अश्विनी पोनाप्पा यांचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिला दुहेरीच्या लढतीत द. कोरियाच्या बेक आणि ली यांनी तनीषा व अश्विनी यांचा 21-13, 19-21, 21-13 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत चीनच्या झेंग आणि हुआंग यांनी भारताच्या सुमित रे•ाr व सिक्की रे•ाr यांचा 21-9, 21-11 असा फडशा पाडला.