कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकमची आत्महत्या ! कुस्ती क्षेत्रात हळहळ : उदयोन्मुख मल्लाचा दुर्दैवी अंत

विटा प्रतिनिधी कुमार महाराष्ट्र केसरी पै. सुरज जनार्दन निकम (30, रा नागनाथनगर, ता. खानापूर, जि. सांगली) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्त्या केली. ही घटना शुक्रवार 28 जून रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कुस्ती क्षेत्रात अत्यंत कमी वयात नावलौकीक मिळवणाऱ्या एका पैलवानाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्य‹ होत आहे. या प्रकरणाची विटा पोलिसांत नोंद […]

कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकमची आत्महत्या ! कुस्ती क्षेत्रात हळहळ : उदयोन्मुख मल्लाचा दुर्दैवी अंत

विटा प्रतिनिधी

कुमार महाराष्ट्र केसरी पै. सुरज जनार्दन निकम (30, रा नागनाथनगर, ता. खानापूर, जि. सांगली) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्त्या केली. ही घटना शुक्रवार 28 जून रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कुस्ती क्षेत्रात अत्यंत कमी वयात नावलौकीक मिळवणाऱ्या एका पैलवानाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्य‹ होत आहे. या प्रकरणाची विटा पोलिसांत नोंद झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिस आाणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पै. सुरज निकम गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. खेळताना सातत्याने होणाऱ्या दुखापतीने तो नैराश्यात गेला होता. सूरजने शुक्रवारी 28 जून रोजी दुपारी राहते घरी गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला मामा भास्कर जोतीराम जाधव यांनी विट्यातील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वी मयत असलेचे घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत ग्रामीण ऊग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पी. जी. रजपूत यांनी वर्दी दिली आहे.
दरम्यान, चपळ आणि उदयोन्मुख पैलवान म्हणून सुरजने अल्पावधीत नावलौकीक मिळवला होता. 2014 साली कुमार महाराष्ट्र केसरी आणि 2018 साली त्याने उपमहाराष्ट्र केसरी किताब मिळवला होता. महाराष्ट्र केसरी पै. अभिजित कटके याच्या विरोधात उपांत्य सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कुस्तीचा सराव करण्यासाठी त्याने धुमछडी आखाडा पंजाब येथे राहणे पसंत केले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा नावलौकीक करण्याचा त्याचा मनसुबा होता.
माती आणि गादी अशा दोन्ही कुस्तीच्या प्रकारात त्याने प्राविण्य मिळवले होते. प्रेक्षणिय कुस्तीने तो कुस्ती शौकीनांच्या स्मरणात राहिल. राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता मल असणाऱ्या पै. सुरजच्या पै. जस्सापट्टी, पै. किरण भगत, पै. समाधान घोडके, पै. बाला राफिक यांच्यासोबत झालेल्या प्रेक्षणीय कुस्त्या स्मरणात राहण्यासारख्या होत्या. नागेवाडी येथे कुस्ती मैदान मोठे व्हावे, यासाठी तो कार्यरत होता.