‘जेएनएमसी’च्या विकासात कोडकणींचे योगदान

केएलई संस्थेकडून डॉ. भालचंद्र कोडकणी यांना श्रद्धांजली : पाच दशकाहून अधिक काळ बजावली सेवा बेळगाव : येथील केएलई शिक्षण संस्थेच्या जवाहरलाल वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉ. भालचंद्र शेषगिरी कोडकणी यांनी पाच दशकाहून अधिक काळ सेवा बजावली आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. जेएनएमसी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन डॉ. एच. बी. […]

‘जेएनएमसी’च्या विकासात कोडकणींचे योगदान

केएलई संस्थेकडून डॉ. भालचंद्र कोडकणी यांना श्रद्धांजली : पाच दशकाहून अधिक काळ बजावली सेवा
बेळगाव : येथील केएलई शिक्षण संस्थेच्या जवाहरलाल वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉ. भालचंद्र शेषगिरी कोडकणी यांनी पाच दशकाहून अधिक काळ सेवा बजावली आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. जेएनएमसी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन डॉ. एच. बी. राजशेखर यांनी केले. येथील जेएनएमसी वैद्यकीय महाविद्यालयात  केएलई उच्च शिक्षण आणि संशोधन यांच्यातर्फे डॉ. भालचंद्र शेषगिरी कोडकणी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, डॉ. कोडकणी यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान अनमोल आहे. आपल्या कामाविषयी असलेली समर्पण भावना यामुळेच ते उच्च पदावर पोहोचले. कामाविषयी असणारी तळमळ व शिस्त हे त्यांच्यातील अत्यंत महत्त्वाचे गुण होते. ते एक उच्च दर्जाचे सर्जन होते. मुंबईहून बेळगावला आल्यानंतर त्यांनी बेळगाव परिसरात आपला मोठा मित्र परिवार जमविला होता. मराठी भाषा बोलता येत असल्यामुळे येथे त्यांना मोठा मित्र परिवार बनविणे शक्य झाले होते.
त्यांना डॉ. प्रभाकर कोरे यांच्याकडूनही अधिक सहकार्य देण्यात आल्याने संस्थेच्या विकासामध्ये भर पडली आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. कोडकणी व जेएनएमसी महाविद्यालयाचा प्रवास चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला. जेएनएमसी महाविद्यालयाने अनेक चढ आणि उतार पाहिले आहेत. या दरम्यान डॉ. जिरगे यांच्या विनंतीवरून डॉ. कोडकणी यांनी जेएनएमसीमध्ये दाखल होऊन सेवा बजावली आहे. जिल्हा रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही सेवा दिली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देण्यात आला आहे. तर केएलई सोसायटीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना केएलई सोसायटीकडून लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला आहे. जेएनएमसी महाविद्यालयात अनेक उपक्रम राबवून यशस्वी केले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधनाची माहिती करून दिली आहे. आदी मान्यवरांकडून त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी कोडकणी कुटुंबीय यासह केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, आशा कोरे, डॉ. हाफीज, डॉ. शिल्पा यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.