कुजिरा शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला
आगशी पोलिसांत तक्रार, तिघांना अटक, गुन्हा नोंद
पणजी : दोघाजणांच्या वैयक्तिक भांडणाचे रूपांतर दोन गटातील संघर्षात होऊन बुधवारी बांबोळी कुजिरा शिक्षण संकुलात एका गटातील झायकुल्ला काझी याने चाकू घेऊन दहशत निर्माण केली आणि तेथील एका गटाच्या विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. आगशी पोलिसांनी एडन फ्ढर्नांडिस याच्या तक्रारीची दखल घेऊन एकूण तिघा जणांना अटक केली असून गुन्हा नोंद केला आहे. जोशुआ झेवियर, शोहेब बेग आणि झायकुल्ला काझी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सर्वजण 20 वर्षे वयोगटातील असून आगशी पोलीस पुढील तपास करीत आहेत. वैयक्तिक बाचाबाची, हेवेदावे यातून हा प्रकार घडला असून त्याला इतर कोणतेही कारण नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताळगाव येथील एडन फ्ढर्नांडिस याने तक्रार केली असून जोशुआ झेवियर व शोहेब बेग आणि झायकुल्ला काझी यांनी आपले मित्र जय खोले तसेच मयंक चव्हाण यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. चंदू प्रकाश महाबर याला ढकलून दिले त्यामुळे तो पडला आणि जखमी झाला. शिवेश नाईक याने चाकू घेऊन येणाऱ्या झायकुल्ला याला अडवण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यालाही दुखापत झाली. झायकुल्ला याने आपल्या मित्रांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे फ्ढर्नांडिस याने तक्रारीत नमूद केले आहे. आगशी पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून गुन्हा नोंद केला आहे. आयपीसी 307, 504, 506 ही कलमे लावण्यात आली आहेत.
पहिली दोन पाने …….
बांबोळी येथील कुजिरा शिक्षण संकुलात शिकणाऱ्या एका कॉलेज विद्यार्थ्यावर बुधवारी एका युवकाने चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. सदर युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी चालू आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ताळगाव येथे मंगळवारी रात्री दोन युवकांत भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्या भांडणातून त्यांच्यात वादावादी होवून एकमेकांसोबत बाचाबाची झाली होती. त्या प्रकाराबद्दल ‘सॉरी’ म्हणून माफ्ढाr मागावी अशी मागणी एका युवकाची होती. त्यासाठी तो चाकू घेऊन बांबोळी येथील कुजिरा शिक्षण संकुलात आला. भर दिवसा तो चाकू घेऊन तेथे इकडून तिकडे फ्ढिरत होता. त्याचा व्हीडिओ देखील समाज माध्यमांवर प्रसारीत झाला आहे. त्यात सर्वांच्या समोर दिवसाढवळ्या तो युवक चाकू हातात घेऊन फ्ढिरताना दिसत आहे. त्यास रोखणारा कोणी दिसत नाही अशी वस्तूस्थीती त्यातून समोर येत आहे. शिक्षण संकुलात हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ माजली असून विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. आगशी पोलीसस्थानकात या प्रकरणाची नोंद झाली असून पुढील तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही कॉलेज विद्यार्थी आणि बाहेरील युवक यांच्यात तेथे तंटा झाल्याची माहिती देण्यात आली.
Home महत्वाची बातमी कुजिरा शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला
कुजिरा शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला
आगशी पोलिसांत तक्रार, तिघांना अटक, गुन्हा नोंद पणजी : दोघाजणांच्या वैयक्तिक भांडणाचे रूपांतर दोन गटातील संघर्षात होऊन बुधवारी बांबोळी कुजिरा शिक्षण संकुलात एका गटातील झायकुल्ला काझी याने चाकू घेऊन दहशत निर्माण केली आणि तेथील एका गटाच्या विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. आगशी पोलिसांनी एडन फ्ढर्नांडिस याच्या तक्रारीची दखल घेऊन एकूण तिघा जणांना […]