केएलएस, झेविअर्स, केएलई, केव्ही-2 संघ उपांत्य फेरीत
बेळगाव : युनायटेड गोवन्स रिक्वेशन क्लब आयोजित तिसऱ्या युनायटेड गोवन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी सेंट झेविअर्सने भरतेश हलगाचा, केएलएसने एम. व्ही. हेरवाडकरचा, केएलई इंटरनॅशनलने ज्ञान प्रबोधनचा, केंद्रीय विद्यालय 2 ने ज्योती सेंट्रलचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावरती घेण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केएलई इंटरनॅशनल संघाने गतविजेत्या ज्ञान प्रबोधन संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण दोघांनाही अपयश आले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 38 व्या मिनिटाला केएलईच्या अब्दुल एचटीने डी बाहेरून मारलेला वेगवान फटका गोलमुखात मारून 1-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात ज्ञान प्रबोधन संघाने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. दुसऱ्या सामन्यात केंद्रीय विद्यालय 2 ने ज्योती सेंट्रलचा 5-1 असा पराभव केला. या सामन्यात 13 व्या मिनिटाला केव्हीच्या रोहितच्या पासवर हर्षल गुरवने पहिला गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 22 व्या मिनिटाला केंद्रीय विद्यालयाच्या हर्षल गुरवच्या पासवर ओमकारने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 36 व्या मिनिटाला ज्योती सेंट्रलच्या स्वप्नील पाटीलने बचाव फळीला चकवत सुरेख गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. 41 व्या मिनिटाला रोहितच्या पासवर हर्षल गुरवने तिसरा गोल केला. 44 व्या मिनिटाला ओमकारच्या पासवर रोहितने चौथा गोल करून 4-1 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.
खेळ संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना केंद्रीय विद्यालयाच्या खेळाडूंनी मारलेला वेगवान फटका बाहेर काढण्याच्या नादात ज्योती सेंट्रलच्या खेळाडूंने स्वत:च्या गोलमुखात चेंडू मारून स्वयंचित गोल करून 5-1 ची आघाडी केव्हीला मिळवून दिली.तिसऱ्या सामन्यात सेंट झेविअर्स संघाने भरतेश सेंट्रलचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात 17 व्या मिनिटाला झेविअर्सच्या इशाक घाटगेच्या पासवर रोशन अब्बासने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 32 व्या मिनिटाला झेविअर्सच्या अर्सलीन मुल्लाने गोल करण्याची नामी संधी दवडली. 38व्या मिनिटाला साहिल बेल्लदने गोल करण्याची संधी दवडल्याने या सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले. चौथ्या सामन्यात केएलएसने एम. व्ही. हेरवाडकरचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात 18 व्या मिनिटाला केएलएसच्या निल बसरीकट्टीने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. 19 व्या मिनिटाला हेरवाडकरच्या वेदांत पाटीलने बचाव फळीला चकवत गोलमुखात चेंडू मारला होता. पण केएलएसचा गोलरक्षक श्रेय कंग्राळकरने उत्कृष्ट अडविल्याने पहिल्या सत्रात गोलफलक कोराच राहिला. 33 व्या मिनिटाला केएलएसचा पवन रायकरने डीमध्ये मुसंडी मारून गोलमुखात वेगवान फटका मारला होता. यावेळी हा चेंडू बाहेर काढण्याच्या नादात हेरवाडकरच्या बचाव फळीतील खेळाडूला चेंडू हाताला लागल्याने पंच सुदर्शन चौगुले यांनी केएलएस संघाला पेनाल्टी बहाल केली. त्याचा फायदा घेत जय रेवणकरने चेंडू गोलमुखात मारून 1-0 ची निर्णायक आघाडी मिळवून दिली. या सामन्यात हेरवाडकरने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले.
शनिवार उपांत्य फेरीचा पहिला सामना
सेंट झेविअर्स विरुद्ध केएलई इंटरनॅशनल सकाळी 8 वाजता. तर दुसरा उपांत्यफेरीचा सामना केएलएस विरुद्ध केव्ही2 यांच्यात सकाळी 9 वाजता
Home महत्वाची बातमी केएलएस, झेविअर्स, केएलई, केव्ही-2 संघ उपांत्य फेरीत
केएलएस, झेविअर्स, केएलई, केव्ही-2 संघ उपांत्य फेरीत
बेळगाव : युनायटेड गोवन्स रिक्वेशन क्लब आयोजित तिसऱ्या युनायटेड गोवन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी सेंट झेविअर्सने भरतेश हलगाचा, केएलएसने एम. व्ही. हेरवाडकरचा, केएलई इंटरनॅशनलने ज्ञान प्रबोधनचा, केंद्रीय विद्यालय 2 ने ज्योती सेंट्रलचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावरती घेण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केएलई इंटरनॅशनल संघाने गतविजेत्या ज्ञान […]