टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे किरण ठाकुर यांना डि.लीट

6 एप्रिल रोजी 40 पदवीदान समारंभात वितरण पुणे / प्रतिनिधी : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने ‘तरुण भारत‘चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक तथा ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी‘चे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर यांना डि.लीट पदवी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 6 एप्रिल रोजी 40 पदवीदान समारंभात डि.लीट पदवीने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष […]

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे किरण ठाकुर यांना डि.लीट

6 एप्रिल रोजी 40 पदवीदान समारंभात वितरण
पुणे / प्रतिनिधी :
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया‘चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक तथा ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी‘चे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर यांना डि.लीट पदवी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 6 एप्रिल रोजी 40 पदवीदान समारंभात डि.लीट पदवीने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड तसेच फोर्ब्स मार्शलचे सहअध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्स यांनाही डि.लीट पदवी प्रदान केली जाणार आहे.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक ज. टिळक यांच्या हस्ते 6 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता  40 पदवीदान समारंभ होईल.  या वेळी स्नातकांना  उद्देशून ते दीक्षांत भाषण करतील. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. गीताली टिळक, उपाध्यक्ष रोहित टिळक, विश्वस्त प्रणति टिळक, सरिता साठे आदींची प्रमुख उपस्थिती असेल.