आमदार चन्नराज हट्टीहोळी यांचा खानापूर तालुका दौरा
अधिकाऱ्यांच्या बैठकीत समस्या सोडविण्याबाबत केल्या सूचना
खानापूर : जनतेच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवण्यात याव्यात, जनतेला शासकीय कामासाठी कार्यालयाला हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच सर्वसामान्य जनतेपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचवा, नागरिकांना आपल्या कामासाठी वरिष्ठांकडे दाद मागण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी सूचना विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी खानापूर तालुक्याच्या दौऱ्यात गंदिगवाड येथे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या. या बैठकीला तहसीलदार प्रकाश गायकवाड, ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडर एगनगौडर यांच्यासह सर्व खात्याचे अधिकारी, ग्रा. पं. चे विकास अधिकारी तसेच ग्रा. पं. चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी गंदिगवाड, इटगी, हिरेमुन्नोळी आणि पारिश्वाड या ग्राम पंचायतींना भेटी देवून कामकाजाबाबत माहिती घेतली. आणि सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर गंदिगवाड येथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना विकासकामाबाबत तसेच जनतेच्या समस्या सोडवण्याबाबत सूचना केल्या. यावेळी आरोग्य, शिक्षण, महसूल तसेच सार्वजनिक बांधकाम आणि कृषी तसेच ग्राम पंचायत यासह विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नागरिकांनी गाऱ्हाणे मांडले. तसेच समस्या सोडवण्याबाबतही विनंती केली.
Home महत्वाची बातमी आमदार चन्नराज हट्टीहोळी यांचा खानापूर तालुका दौरा
आमदार चन्नराज हट्टीहोळी यांचा खानापूर तालुका दौरा
अधिकाऱ्यांच्या बैठकीत समस्या सोडविण्याबाबत केल्या सूचना खानापूर : जनतेच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवण्यात याव्यात, जनतेला शासकीय कामासाठी कार्यालयाला हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच सर्वसामान्य जनतेपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचवा, नागरिकांना आपल्या कामासाठी वरिष्ठांकडे दाद मागण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी सूचना विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी खानापूर तालुक्याच्या दौऱ्यात गंदिगवाड येथे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या. या बैठकीला तहसीलदार प्रकाश गायकवाड, […]