‘रघुथाथा’मध्ये कीर्ति सुरेश
भाषिक राजकारणावर आधारित कहाणी
दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेश स्वत:चा आगामी चित्रपट ‘रघुथाथा’वरून चर्चेत आहे. अलिकडेच याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट कॉमेडी धाटणीचा असून तो भाषा लादण्याच्या संवेदनशील मुद्द्याला हास्याच्या स्वरुपात दर्शविणारा आहे.
1980 च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘रघुथाथा’मध्ये कीर्तिने कयालविझी ही भूमिका साकारली आहे. या युवतीला स्वत:ची मातृभाषा तमिळ व्यमितरिक्त अन्य भाषा समजून घेण्याच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. भाषिक राजकारणाला हलक्या-फुलक्या मनोरंजनाशी जोडणारे वातावरण तयार करणारी कहाणी यात दर्शविण्यात आली आहे.
या चित्रपटाच्या टीझरला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात एम.एस. भास्कर, रविंद्र विजय, देवदर्शिनी, राजीव रविंद्रनाथन, जयकुमार, आनंदसामी, राजेश बालाचंदिरन आणि इस्माथ बानू हे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमन कुमार यांनी केले आहे. तर संपादनाची जबाबदारी टी.एस. सुरेश यांनी सांभाळली आहे.
Home महत्वाची बातमी ‘रघुथाथा’मध्ये कीर्ति सुरेश
‘रघुथाथा’मध्ये कीर्ति सुरेश
भाषिक राजकारणावर आधारित कहाणी दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेश स्वत:चा आगामी चित्रपट ‘रघुथाथा’वरून चर्चेत आहे. अलिकडेच याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट कॉमेडी धाटणीचा असून तो भाषा लादण्याच्या संवेदनशील मुद्द्याला हास्याच्या स्वरुपात दर्शविणारा आहे. 1980 च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘रघुथाथा’मध्ये कीर्तिने कयालविझी ही भूमिका साकारली आहे. या युवतीला स्वत:ची मातृभाषा तमिळ व्यमितरिक्त अन्य भाषा […]