के. आर. शेट्टी, जिमखाना, एमसीसी, हावेरी उपांत्य फेरीत
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए फोर्थ झोन क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हावेरी जिल्हा संघाने युनायटेड बालाजीचा, युनियन जिमखानाने कर्नाटक क्रिकेट क्लबचा, के. आर. शेट्टी लायाजने मुंदगोड क्रिकेट अकादमीचा तर एमसीसीने बेळगावने दुर्गा स्पोर्टस क्लब हुबळी ब चा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. रोहित देसाई, निशांत व्ही., रामलिंग पाटील, गौसपिर हाजी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससी हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात कर्नाटका क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 6 गडी बाद 185 धावा केल्या. त्यात महमद सादिकने 4 षटकार 8 चौकारांसह 88, मझर खानने 37, अक्षय पाटीलने 14 तर वासिम व सलमान यांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. युनियन जिमखाना ब तर्फे रोहित पोरवाल आणि रोहित देसाई यांनी प्रत्येकी 2 तर शुभम भादवणकरने 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना ब ने 26.5 षटकात 6 गडी बाद 190 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात गणेश केने 4 चौकारासह नाबाद 65, रोहित देसाईने 4 चौकारांसह 35, राहुल नाईकने नाबाद 23, शुभम भादवणकरने 20 तर मिलिंद चव्हाणने 15 धावा केल्या. कर्नाटका क्लबतर्फे इजाज मुल्लाने 30 धावांत 3 तर अक्षय व मोहम्मद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात हवेरी जिल्हा क्रिकेट संघटनेने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 8 गडी बाद 193 धावा केल्या. त्यात सचिनने 3 षटकार व 11 चौकारांसह 99 धावा, साई प्रसादने 17, अविनाशने 15 तर संजयने 10 धावा केल्या. युनायटेड बालाजीतर्फे वासू लमानीने 2 तर अजय अजित, मारुती, नामदेव, रवी व सुनील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युनायटेड बालाजीचा डाव 20.5 षटकात 108 धावात गारद झाला. त्यात सुनील कोलकारने नाबाद 29, अविनाशने 15 तर आनंद शिंदेने 14 धावा केल्या. हावेरीतर्फे निशांत व्ही. ने 13 धावात 7 गडी बाद केले. बेळगाव केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात श्री दुर्गा स्पोर्टस क्लब हुबळी ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 9 गडी बाद 156 धावा केल्या. त्यात पवन शालगारने 2 षटकार 3 चौकारांसह 31, शिवानंद नायकने नाबाद 29, शिवराज करडीने 25, देवराज कोटी व देवराज बारकाज यांनी प्रत्येकी 21 धावा केल्या. एमसीसीतर्फे गौसपीर हाजिने 12 धावात 3, मुनिराज व तारिक यांनी प्रत्येकी 2 तर अशोक व दादापिर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसी संघाने 26.1 षटकात 3 गडी बाद 159 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात अविनाशने 9 चौकारांसह 66 तर गौसपिर हाजिने नाबाद 37, लतिफ सनदीने 17, तारिक पटवेगारने नाबाद 14 तर मलिकरेहन मुल्लाने 12 धावा केल्या. हुबळीतर्फे शिवराज करडीने 28 धावात 3 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात के. आर. शेट्टी लायाज संघाने प्रथम फलंदाजी करताना 29 षटकात 3 गडी बाद 318 धावा केल्या. त्यात अनुराग बाजपेयीने 1 षटकार, 17 चौकारांसह 100 धावा करून शतक झळकविले. त्याला रामलिंग पाटीलने 8 षटकार, 8 चौकारांसह नाबाद 90, गुरुप्रसाद पोतदारने 1 षटकार व 10 चौकारांसह 78, गिरीष नाडकर्णीने नाबाद 21 तर प्रशांत लायंदरने 12 धावा केल्या. मुंदगोडतर्फे अनिल कोरवीने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंदगोड अकादमीचा डाव 24.3 षटकात 184 धावात आटोपला. त्यात सुबय्यादेव प्रसादने 5 षटकार, 7 चौकारांसह 56, नागराज रायकरने 45, रवी शंकरने 17 तर अनिल कोरवीने 15 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे रामलिंग पाटीलने 39 धावात 4, सुनील सक्रीने 57 धावात 4, अनुराग व आनंद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
Home महत्वाची बातमी के. आर. शेट्टी, जिमखाना, एमसीसी, हावेरी उपांत्य फेरीत
के. आर. शेट्टी, जिमखाना, एमसीसी, हावेरी उपांत्य फेरीत
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए फोर्थ झोन क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हावेरी जिल्हा संघाने युनायटेड बालाजीचा, युनियन जिमखानाने कर्नाटक क्रिकेट क्लबचा, के. आर. शेट्टी लायाजने मुंदगोड क्रिकेट अकादमीचा तर एमसीसीने बेळगावने दुर्गा स्पोर्टस क्लब हुबळी ब चा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला […]