पत्रकार मनीषा सुभेदार यांचा सत्कार

माहिती-प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयात पत्रकार समुहातर्फे आयोजन बेळगाव : अनेक गुणवंतांच्या सत्काराच्या, पुरस्काराच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांचा सहसा सन्मान होत नाही. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. दीर्घकाळ उत्तम पत्रकारिता केलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी पत्रकारच एकत्र आले ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे, असे मत ‘द हिंदू’चे बेळगाव प्रतिनिधी ऋषिकेश बहाद्दूर देसाई यांनी व्यक्त केले. बेळगावातील समस्त पत्रकारांच्यावतीने […]

पत्रकार मनीषा सुभेदार यांचा सत्कार

माहिती-प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयात पत्रकार समुहातर्फे आयोजन
बेळगाव : अनेक गुणवंतांच्या सत्काराच्या, पुरस्काराच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांचा सहसा सन्मान होत नाही. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. दीर्घकाळ उत्तम पत्रकारिता केलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी पत्रकारच एकत्र आले ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे, असे मत ‘द हिंदू’चे बेळगाव प्रतिनिधी ऋषिकेश बहाद्दूर देसाई यांनी व्यक्त केले. बेळगावातील समस्त पत्रकारांच्यावतीने 30 वर्षे कार्यरत असलेल्या ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’च्या पत्रकार मनीषा सुभेदार, युएनआयचे एच. व्ही. नागराज, उदयवाणीचे केशव आदी यांचा माहिती व प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयात बुधवारी सत्कार करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, पत्रकार सुभाष कुलकर्णी, दिलीप कुरुंदवाडे, अशोक चंदरगी, पुंडलिक बाळोजी आदी उपस्थित होते.यावेळी मुर्गेश शिवपुजी, मेहबूब मकानदार, सहदेव माने, महेश विजापूर, मनोहर कालकुंद्रीकर, दिलीप कुरुंदवाडे, मुन्ना बागवान, व्ही. के. सुरेश, कीर्ती कासारगोड यांनी सत्कारमूर्तींच्या पत्रकारितेबद्दल गौरवोद्गार काढले. सुभाष कुलकर्णी यांनी पत्रकारिता नकारात्मकतेकडे झुकणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप करताना गुरुनाथ कडबूर यांनी पत्रकारांनी एकत्र येण्यासाठी आजचा कार्यक्रम शुभारंभ ठरल्याचे सांगितले. पत्रकार समुहातर्फे सत्कारमूर्तींचा शाल, पुष्पहार व पगडी घालून तसेच पुस्तक व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. रवी उप्पार यांनी प्रास्ताविक केले. सुनीता देसाई यांनी सूत्रसंचालन केले.