जम्मू-काश्मीरमध्ये आता विकासपर्व : मोदी
जम्मूमध्ये एम्स-आयआयएमचे केले उद्घाटन : फुटिरवाद-दहशतवाद संपण्याच्या मार्गावर
वृत्तसंस्था/ जम्मू
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी जम्मू येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे (एम्स) उद्घाटन केले आहे. खास बाब म्हणजेच 2019 मध्ये या एम्सच्या निर्मितीकार्याला पंतप्रधान मोदींच्या हस्तेच सुरुवात करण्यात आली होती. पंतप्रधानांनी जम्मूमध्ये सुमारे 32 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले आहे. तसेच मोदींनी जम्मू विमानतळासाठी नवे टर्मिनल भवन आणि कॉमन युजर फॅसिलिटी पेट्रोलियम डेपोच्या कार्याचा शुभारंभ केला आहे. पूर्वी जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद, फुटिरवादाचा आवाज ऐकू यायचा, परंतु आता येथे प्रत्येक क्षेत्रात विकास होत आहे. केंद्रशासित प्रदेशात आता 12 वैद्यकीय महाविद्यालये असून काश्मीर खोरे रेल्वेने जोडले गेले आहे. दोन एम्स निर्माण होणारे जम्मू-काश्मीर हे देशातील पहिले क्षेत्र असल्याचे उद्गार मोदींनी यावेळी काढले आहेत.
पूर्वी भारताच्या एका हिस्स्यात कामं व्हायची आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांना अत्यंत विलंबाने विकासाचा लाभ मिळायचा. परंतु आता हे चित्र बदलले आहे. जम्मू विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम होत आहे. काश्मीरला कन्याकुमारीशी रेल्वेद्वारे जोडण्याचे काम वेगाने पुढे जात आहे. लवकरच काश्मीरमधून रेल्वेतब् ासून लोक पूर्ण देशाच्या प्रवासावर निघतील. जम्मू-काश्मीरला आज (मंगळवारी) पहिली इलेक्ट्रिक रेल्वे मिळाली असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
देशात वंदे भारत आधुनिक रेल्वे सुरू झाल्यावर याच्या प्रारंभिक मार्गांमध्ये जम्मू-काश्मीरची निवड करण्यात आली. माता वैष्णोदेवीपर्यंत पोहोचणे सुलभ करण्यात आले. गावातील रस्ते असो किंवा राष्ट्रीय महामार्ग चहुबाजूने काम होत आहे. हे काम पूर्ण झाल्यावर शेतकरी आणि व्यावसायांना लाभ होणार आहे. महिलांना ड्रोन पायलट करण्याची गॅरंटी आमच्या सरकारने दिली आहे. या ड्रोनद्वारे शेती आणि बागायतीमध्ये मदत होणार आहे. हजारो स्वयंसहाय्य समुहांना लाखो रुपयांचे ड्रोन देण्यात येणार असल्याचे मोदी म्हणाले.
भ्रष्टाचार-तुष्टीकरणाच्या विरोधात नवे राजकारण
कलम 370 हद्दपार झाल्यावर मी हिमतीने देशवासीयांना पुढील निवडणुकीत भाजपला 370 जागांवर विजयी करण्याचे आणि रालोआला 400 हून अधिक जागा देण्याचे आवाहन केले. जम्मू-काश्मीरमध्ये जे लोक दशकांपर्यंत अभावात जगत होते, त्यांनाही आज सरकार असल्याची जाणीव झाली आहे. गावागावात आता एका नव्या राजकारणाची लाट सुरू झाली आहे. भ्रष्टाचार-तुष्टीकरणाच्या विरोधात युवांनी आवाज उठविला आहे. प्रत्येक युवा स्वत:चे भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. जेथे बंद आणि संप व्हायचा तेथे आता विकासाचे चक्र फिरू लागले असल्याचे मोदी म्हणाले.
जम्मू-काश्मीरचा गौरव
आमच्या सरकारनेच वन रँक-वन पेन्शन लागू केली. जम्मूतील माजी सैनिकांनाच 1600 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे. सरकार संवेदनशील आणि लोकांच्या भावना समजून घेणारे असेल तर वेगाने कामं होतात. आता आम्ही एक नवा जम्मू-काश्मीर निर्माण होताना पाहत आहोत. येथील विकासात सर्वात मोठा अडथळा कलम 370 हेच हेत. कलम 370 भाजप सरकारने हटविले आहे. आता जम्मू-काश्मीर संतुलित विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. चालू आठवड्यात आर्टिकल 370 नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हे पाहता देशात जम्मू-काश्मीरचा जयजयकार होणार असल्याचे वाटतेय असे वक्तव्य मोदींनी केले आहे.
शाळांचा कायापालट
एकेकाळी काश्मीरमध्ये शाळा पेटवून दिल्या जात होत्या, तर आता शाळा सजविण्यात येत आहेत. जम्मू-काश्मीरच्या आरोग्य सेवांमध्ये वेगाने सुधारणा होत आहे. 2014 मध्ये येथे केवळ 4 वैद्यकीय महाविद्यालये होती आता ही संख्या 12 वर पोहोचली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता दोन एम्स निर्माण होत आहेत. स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत दिल्लीत एकच एम्स असायचे, गंभीर आजारावरील उपचारासाठी लोकांना दिल्लीत जावे लागायचे, मी जनतेला जम्मूमध्ये एम्स निर्माण करण्याची गॅरंटी दिली होती. ही गॅरंटी पूर्ण करून दाखविली असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
Home महत्वाची बातमी जम्मू-काश्मीरमध्ये आता विकासपर्व : मोदी
जम्मू-काश्मीरमध्ये आता विकासपर्व : मोदी
जम्मूमध्ये एम्स-आयआयएमचे केले उद्घाटन : फुटिरवाद-दहशतवाद संपण्याच्या मार्गावर वृत्तसंस्था/ जम्मू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी जम्मू येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे (एम्स) उद्घाटन केले आहे. खास बाब म्हणजेच 2019 मध्ये या एम्सच्या निर्मितीकार्याला पंतप्रधान मोदींच्या हस्तेच सुरुवात करण्यात आली होती. पंतप्रधानांनी जम्मूमध्ये सुमारे 32 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले आहे. तसेच मोदींनी जम्मू […]
